या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आकड्यांचे चमत्कार
५१



 बापरे ! वजाबाकी तर आपण कधी केलीच नाही. सरदारसाहेबांची असहाय्य मुद्रा पाहून इतरांनी त्यांना मदत केली :

   ८ ५ ३
  - ३ ५ ८
  ----------
  ४ ९ ५
“आता ही संख्या उलटी करून त्यात मिळवा." - साधू.

   ४ ९ ५
  - ५ ९ ४
  ----------
   १ ० ८ ९

 आहे की नाही गंमत?" साधूने विचारलं. लोकांना कळेना - गंमत कसली? साधूने खुलासा केला, “कुठलीही संख्या सरदारसाहेबांनी सांगितली असती तरी उत्तर नेमकं हेच येतं."

 सूचना : तीन अंकी संख्या उलटी करून, मोठीतून छोटी संख्या वजा केल्यावर वजाबाकीत शून्य आल्यास ते वगळू नये.

 उदाहरणार्थ :

 २ ५ १ ह्या संख्येची उलट १ ५ २

  २ ५ १

 - १ ५ २

 ---------

 ० ९ ९ ह्याची उलट ९ ९ ० येते.

 (येथील शतकस्थानचे ० वगळून नुसते ९ ९ लिहू नयेत.)

(२)

 "कुठल्याही दोन संख्या सांगा - मात्र शून्य वगळून.” साधू पुढे म्हणाला. एका चुणचुणीत शाळकरी पोराने सांगितलं. ५, ९

 “ठीक. दुसऱ्या संख्येत एक मिळवून पहिलीने भागा" - साधू. पोराने गणित केलं.

 ९ + १ = १० १० ÷ ५ = २

 “आता आपल्याकडे तीन संख्या झाल्या - ५, ९, २” साधू