या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
गणितातल्या गमती जमती


सोडवणं पुष्कळ वेळा शक्य होत नाही ! कारण पुष्कळ वेळां लूप अतिशय वेडावाकडा असतो.

 निसर्गाची मदत घेतली की हा प्रश्न सुटतो. साबणाचे फुगे करतो त्या प्रमाणे साबणाचे पाण्यात मिश्रण तयार करा. दिलेल्या आकाराचा तारेचा लूप त्यात बुडवा. बाहेर काढल्यावर त्या लूपला चिकटलेली साबणाची बारीक फिल्म तयार होते. पृष्ठताण (सर्फेस टेंशन) ह्या नैसर्गिक गुणामुळे ह्या फिल्मचा पृष्ठभाग शक्य तितका कमी करायची निसर्गाची प्रवृत्ती असते. म्हणून तयार झालेल्या फिल्मचा पृष्ठभाग हेच या प्रश्नाचं निसर्गानं दिलेले उत्तर !

  हळूहळू वळवून त्याचा आकार बदलल्यास हा पृष्ठभाग बदलतो. कधीकधी त्यात गमतीचे बदल होतात. प्रत्यक्ष प्रयोग करून पहा.


♦ ♦ ♦