पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ असें कोणीही हाणेलू. तसेंच एक पृथ्वी फिरवावयास सोर्प किंवा ग्रह, तारे व सर्व अनंतत्रह्मांड फिरवावयास सोपें असा कोणी प्रश्न केला तर एक पृथ्वी फिरविण्यास सोपें असें कोणीही सांगेल. यांत पृथ्वी फिरतेच आहे असें जरी ह्मणतां येत नाहीं तरी त्यांत सौकर्य आहे असें कबूल केलें पाहिजे. ७. उंच गचीवरून धोंडा खालीं फॅकला तर तो त्याच्या ओळंब्याखालच्या स्थानापुढें कांहीं अंतरावर पूर्वेस जाऊन पडतो. ही गोष्ट नेहमीं पडताळून पाहतां येणारी आहे. भिंतच तिरकी असेल किंवा लंबरेषा पहातांच येणार नाही, अशा प्रकारच्या शंका काढणारांस मूर्खच ह्मटलें पाहिजे. धोंडा नेहमीं पूर्वस पडती असें जर नेहमीं अनुभेवास येत आहे तर पृथ्वी आंसासभोंवतीं फिरत आहे असेंच ह्मणावें लागतें. त्या शिवाय धोंड्याच्या पूर्वगतीची उपपत्ति करितांच येत नाहीं. ८. फोकाल्टच्या आंदोलकाचा अनुभव उर्गेच कांहीं तरी बोलून उडवून देतां येत नाही. उंचीवरून एक तार टांगून तिच्या शेवटासे आंदोलक अडकविलुा आणि त्यास उत्तरदक्षिण, किंवा पूर्वपश्चिम, किंवा दुस-या कोणतेही दिशेनें हेलकावे खाण्यास लाविलें, तर हळू हळू ती हेलकाव्यांची दिशा बदलत जाते. हा फेरबदल एका तासांत ( १९ अशxभुजज्या अक्षांश ) इतक्या बेतानें नेहमीं झालेला अनुभवास येतो. पृथ्वी जर स्थिर असती तर हा फेरबदल ह्मणजे दिशाभेद कधीही झाला नसता. दिशाभेद होतो असें जर नेहमीं अनुभवास येत आहे तर पृथ्वी आपुले ऑसासभोंवती फिरते आहे असेंच ह्मष्ठलें पाहिजे. חצי ** ९. सतत एक दिशेनें वाहणारे वायु, ह्मणजे “ ट्रेड विंडस् ” विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशांत वारा सतत ईशान्येकडून वहात असतो; आणि दक्षिणेकडुल प्रदेशांत आग्रेयीकडून वाहत असतो. या वान्याचा अनुभवू नौकूगमन करणाच्यांस नेहमीच्या असतो. सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे विषुववृत्ताकडील प्रदेश तापून तेथील वायु