या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १४७
 

पूर्वीच्या काळी दिवस न दिवस, महिनेच्या महिने जी सत्रे चालत त्यांतही असे काही निव्वळ गमतीचे, काही शृंगारिक, वगैरे करमणुकीचे प्रकार असत. किंबहुना, सर्व नाट्याचा उगम धार्मिक उत्सवात, जादूटोण्यात आहे असाही काहींचा दावा आहे. हा करमणुकीचा प्रकार अश्लील असावा का? नसला तरी चालेल. मोठमोठे संभावीत व विद्वान कीर्तनकार, प्रवचनकार काही भारुडात काम करीत नाहीत. ते बरेचसे अर्धवट शिक्षित लोकच करतात. लोकांना हसवायला सर्वात सोपे साधन म्हणजे निर्लज्ज हावभाव व द्वर्थी वाक्ये, ही फार सनातन कालापासून चालू आहेत. सबंध पंधरवडा होणाऱ्या अखंड भजनात थोडासा हा प्रकार झाला- व तोही खरोखरच थोडासा झाला- तर हरकत नसावी. सर्वांच्या मनात वसणाऱ्या अश्लीलतेला वा बीभत्सपणाला इतक्या थोड्या सामग्रीवर वाट करून देऊन जर ती इतर वळा, इतर जीवनात दृढनिद्रा घेईल तर ही दिलेली किंमत थोडीच वाटते.
 वैराग्यपर कवितेत बीभत्सपणाला वाव पुष्कळच असतो. वासनामय ससाराचा त्याग करायला सांगताना त्या संसाराचे जितके किळसवाणे वर्णन करता येईल तितके करायचे हा प्रघात फार जुना आहे. वारकरी सांप्रदायही त्याला अपवाद नाही. अशाच कित्येक कवनांपैकी मदालसा या नावाने ओळखले जाणारे एक बरेच लांबलचक काव्य आहे. कोणीएक मदालसा नावाची राजस्री आपल्या पत्रांना पाळण्यातच वैराग्याचा उपदेश करते व ते पुत्र पूर्ण विरागी होतात अशी एक कथा आहे. त्यातले मदालसेने आपल्या मुलाना केलेले उपदेश ह्या काव्यात गोवलेले आहेत. "उपदेशे मदालसा । सोऽह जो जो रे पुत्रा।।" हे त्याचे ध्रपद. हे गाणे मी दोन-चारदा तरी ऐकले. वारकऱ्यांच्या मनात वैराग्यपर भावना त्यामळे कदाचित उसळत असतील, पण माझे मन त्या काव्याला विटले हे बरीक खास. “मनुष्याच्या सुदर त्वचेच्या आत रक्त, मांस. वगैरे कशी द्रव्ये आहेत, मलमूत्र कसे त्याच्या शरीरात आहेत, त्याच्या नाकात शेंबड किती आहे - त्याचप्रमाणे व्याधी व जरेने हे सुंदर शरीर कसे करूप होऊन जाते म्हणून, हे प्राण्या, ह्या शरीराचे व्याप सोड, ब्रह्मचर्याचा स्वीकार कर व संसारापासून निवृत्त हो.हा उपदेश पुरुषांना केलेला असतो. आणि ते ठीकच आहे. बाया ना रंग, ना रूप अशा मांसाच्या गोळ्याला जन्म देतात. त्या खादाड जिवाची दर तीन-चार तासांनी भूक भागवितात. दर तीन-चार तासांनी त्यांचे मुताचे कपडे बदलतात. त्याचे गुवाने भरलेले ढंगण व अंग धुऊन काढतात व ह्या सगळ्या खस्ता