या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ५९ खवळला बाजी स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥ दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥ मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । युद्धास ॥ अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥ तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनी हाच ध्यास ॥ बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥ सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥ विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ।। कराडास डेरे दिले घेई बहूं किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥ दळव्यांसी लढून घेई शृंगारपुरास । मारले पाळेगारांस ॥ लोकप्रीतीकरितां करी गुरु रामदासास । राजगडी स्थापी देवीस ॥ मिष्ट अन्नभोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ।। तानसेनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥