या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(आठ) महात्मा फुले : समग्र वाङ्मय समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे फुले-आंबेडकरांचे विचार सांगणारे हे वाङ्मय म्हणूनच घराघरात गेले पाहिजे, असे मला वाटते. तत्कालीन संदर्भ लक्षात घेऊन या ग्रंथाची सार्वजनिक ठिकाणी, गावागावात पारायणे झाली पाहिजेत. आजच्या तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा हा फुलेवादी जाहीरनामा आपला जीवननामा म्हणून स्वीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. समाजक्रांतीच्या या दोन्ही अग्रदूतांना माझे कृतज्ञतापूर्वक प्रणाम! Ovaryant मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दि. १४ एप्रिल १९९१ शरद पवार मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.