या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात इंग्रज बाहादरचे राज्याच्या प्रतापानें अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस तुरळक तुरळक लिहितां वाचतां येऊं लागलें आहे, म्हणून आज हजारों वर्षांपासून धूर्त आर्यांकडून शूद्रादि अतिशूद्र चहूंकडून नाडले जातात, याविषयीं सत्सार या नांवाचे छोटेखानी पुस्तकांत नित्य वाटाघाट करून जगद्वेष्ट्या आर्य ब्राह्मणांची खात्री करावी, म्हणून हा पहिला अंक वाचकांपुढें आणिला आहे. या पुस्तकाचे पुढचे अंक आम्ही अमक्या वेळी प्रसिद्ध करीत जाऊं, म्हणून आम्ही वचनानें बांधले जात नाहीं. परंतु या आमच्या अल्पशा प्रयत्नास आमचे निःपक्षपाती विचारशील महंमदी, ख्रिस्ती व हिंदू बांधवांनी उदार आश्रय दिल्यास या पुढचे अंक दर आठवड्याससुद्धां सादर केले जातील. पुस्तककर्ता DOO 00