मामा परमानंद यांस पत्र १८७९ साली श्री. शंकर तुकाराम शाळीग्राम यांनी "धोर पुरुषांचे आणि स्त्रियांचे पोवाडें" हा पोवाड्यांचा संग्रह प्रसिद्ध केला. एच. ए. अॅकवर्थ हे इतिहास प्रेमी आय. सी. एस. अधिकारी याच वर्षी मुंबईच्या सचिवालयात महसूल खात्याचे अवर सचिव म्हणून काम करीत होते. त्यांच्याच खात्यात जोतीरावांचे स्नेही नारायण महादेव उर्फ मामा परमानंद अधीक्षक म्हणून काम करीत होते. मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे पोवाडे गोंधळ्यांना मुखोद्गत होते. त्यांच्याकडून ते ऐकून व उतरवून घेऊन पोवाड्यांचे संकलन व प्रकाशन करण्याचे काम शंकरराव शाळिग्रामांचा कित्ता गिरवून त्यांच्या सहकार्याने करण्याचा अॅकवर्थसाहेबाने निर्धार केला. १८८६ पासून या कामास सुरुवात करून त्याने शंकरराव शाळिग्रामांचे सहकार्य मिळवून १८९१ साली "इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे, " हा संग्रह प्रसिद्ध केला. पोवाड्यांच्या संकलनाच्या या कामात अॅकवर्थला मामा परमानंद मदत करीत असत. जोतीरावांच्या संग्रहात असे पोवाडे असण्याची शक्यता लक्षात घेऊन मामा परमानंदांनी ३० मे, १८८६ रोजी जोतीरावांना एक पत्र पाठवले होते. त्याला जोतीरावांनी पाठवलेले उत्तर पुढे छापले आहे. Time 3198 ि क
पान:Samagra Phule.pdf/४६४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही