४२४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय मामा परमानंद यांस पत्र मुक्काम पुणें त।। २ माहे जून १८८६ ई ॥ राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद || आंबेर साष्टांग नमस्कार वि. वि. आपलें त।। ३० माहे गुदस्तचे कृपापत्र पावलें. त्याचप्रे ॥ पुण्याचे हायस्कुलांतील भागवतमास्तर यानी शंकर तुकाराम यानीं छापलेलें पवाड्याचे पुस्तकांतील कांहीं शाहीरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळविले की, सदरचे पवाड्याची प्रत मजजवळ नाहीं आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयीं कांहीं कळवितां येत नाहीं. नंतर त्यांनीं तें पुस्तक मला आणून देण्याचें कबूल केलें. परंतु त्यांनी कबूल केल्याप्रे ।। पवाड्याचें पुस्तक आणून दिलें नाहीं. सबब त्याविषयीं मला कांहीं आपल्यास लिहून कळवितां आलें नाहीं. फितुरी गोपीनाथपंताचे साह्यानें शिवाजीनें दगा करून अफझुलखानाचा [वध ?] केला. तान्हाजी मालुसऱ्यानें घोरपडीचे साह्यानें सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीनें पुण्यांत दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वांच्या कच्च्या हकीकतीचे खरे पवाडे माझे पहाण्यांत आले नाहींत. आज दिनपावेतों युरोपियन लोकांनीं जे कांहीं इतिहास तयार केले आहेत, ते सर्व शूद्र आणि अतिशूद्रांची वास्तविक स्थिति ताडून न पहातां + + + झांकून आर्य भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरंवसा ठेवून इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेंसोरें नवीन पवाडे करून हळूच मैदानांत आणीत आहेत. त्यापैकीं माझे पहाण्यांतही बरेच आले आहेत आणि त्यांतील शूद्रांनी कमविलेल्या मोत्यापोंबळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मणासह दादोजी कोंडदेवास फाजील आगांतुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाहीं. आठ वर्षांपूर्वी जेव्हां मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलों होतों, तेव्हां
पान:Samagra Phule.pdf/४६५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही