या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्यशोधक समाजाची स्थापना २४-९-१८७३ तुकाराम हनमंत पिंजन वाचून सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी काही महिने अगोदर जुना गंज पुणे येथे बाणेकराचे तालमीच्या दक्षिण बाजूचे चौकात तुकाराम नाईकाच्या दुमजली घर नं. ५२७ यांत कैलासवासी धर्मतत्त्वज्ञ जोतीराव गोविंदराव फुल्यांच्या मुशी विकण्याचे दुकानात दीवे लागल्यावर पुष्कळ मंडळी जमत असे. त्यातून रामशेट उरवणे (आडते), विठोबा गुठाळ (आडते ), कुशाबा माळी, नानाच्या पेठेतील कबीरपंथी मठातील ज्ञानगिरी बुवा, धोंडीराम कुंभार, ग्यानोबा झगडे माळी (मीस्त्री), रामचंद्र व कृष्णराव भालेकर, विनायकराव बाबाजी (ब्राह्मणेतर म्याट्रीक), बाबाजी मनाजी (कोच बिल्डर), तुकाराम हनमंत पिंजन ( विद्यार्थी) हे नित्य रविवारी येत असत. ज्ञानगिरी कबीराने केलेल्या बीजक ग्रंथातील बीप्रमती भाग जमलेल्या मंडळीस बुवा दाखवीत. बीजक ग्रंथ ब्रीज भाषेत असल्यामुळे बीप्रमती भागाचा ज्ञानगिरी बुवा मराठीत तर्जुमा करून मंडळीस सांगत असत. त्यात ब्राह्मणाच्या स्वार्थाचे, स्वभावाचे, वर्तणूक वगैरेचे फार वर्णन आहे. हे ब्राह्मणाचे गुण जोतीरावांस चांगले अवगत होते. अगोदर त्यांनी स्त्री शिक्षणाच्या व महारामांगाच्या शाळा घातल्या होत्या. ब्राह्मणात पुनर्विवाहाची चाल त्यांच्याकडून सुरू झाली. सुतीकागृह तर त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात त्यांच्या घरी होते. ब्राह्मण विधवेपासून झालेला चारपाच वर्षाचा शांताराम नावाचा मुलगा त्यांचेजवळ होता. तो मयत झाल्यावर ब्राह्मण विधवेचा यशवंतराव नावाचा दुसरा मुलगा त्यांचेजवळ होता. त्यास, ससाण्याने आपली मुलगी सत्यशोधक समाज स्थापन झाल्यावर काही दिवसांनी दिली. या संस्था त्यांनी उदयास आणल्या तरी त्यांची मनोवृत्ती स्वस्थ राहिली नाही. ते हमेशा म्हणत कीं, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांचे अतिशय नुकसान केले, त्यातून बीप्रमतीतील ब्राह्मणांच्या गुणवर्णनाची त्यास पुष्टी मिळाल्यावर ब्राह्मणांपासून ब्राह्मणेतरांची सुटका कशी होईल, हे विचार त्यांच्या मनांत खेळू लागले. ते म्हणत की, माझ्या एकट्याच्याने ब्राह्मणेतरांची ब्राह्मणांपासून सुटका होणार नाही. मला मंडळी साह्य होईल तर काही करता येईल. त्यावरून जमत