या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ३ महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीचे मृत्युलेख जोतीरावांच्या मृत्यूनंतर समकालीनांनी त्यांच्या जीवनकार्याचे कसे मूल्यमापन केले हे जाणण्याचे प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाला कुतूहल होते. गेल्या शतकातील वृत्तपत्रांच्या संचिका चाळताना “केसरी” व “सुधारक" या विख्यात साप्ताहिकांनी जोतीरावांच्या मृत्यूची दखलही घेतली नाही असे दिसले. मुंबईच्या इंदुप्रकाशने जोतीरावांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी एक स्फुटलेख लिहिला. "बडोदावत्सल" हे सत्यशोधक विचारसरणीचे साप्ताहिक होते. त्यातील तसेच ज्ञानोदयातील मृत्युलेखात जोतीरावांच्या कार्याचा गौरव केलेला आढळतो. जोतीरावांचे स्नेही बाबा पदमनजी यांनी जोतीराव पक्षघाताने आजारी असताना त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीची आठवण त्यांनी मृत्युलेखात सांगितली आहे DOO