या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रान्सचे नाही म्हणावयाचे, तर उरालपर्वताच्या पूर्वेकडील मंगोल टोळ्यांचे प्रदेश रशियाचे कसे होतात? फ्रान्स, इंग्लंड व बेल्जियम यांनी आफ्रिकनांवर अत्याचार केले, ते जाहीर होतात; काझाक, काल्मुक वगैरे लोकांवर रशियाने काय जुलूम केले ते बाहेर फारसे फुटू शकत नाहीत. राजसत्ताक, प्रजासत्ताक वा कम्युनिस्ट प्रजासत्ताक - कोणतीही राज्यव्यवस्था असली, तरी ती संपूर्णतया साम्राज्यवादी असू शकते, ही सत्यस्थिती आहे; व साम्राज्य आले म्हणजे समता अशक्य, हेही तितकेच खरे. हे सत्य विचार करण्यासारखे आहे. अधिकार गाजविण्याची सवय झालेल्या लोकांचा अधिकार गेला, किंवा काहींना अधिकार मिळालाच नाही, असे लोक तो मिळविण्यासाठी ध्येयवादाचे कसे पांघरूण घेतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून केरळराज्यातील शिक्षणविषयक विधेयकाकडे बोट दाखविता येईल. हे विधेयक पहिल्याने प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यात व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा येईल, अशी काही कलमे होता; पण लोकमताला मान देऊन ती दूर केली आहेत. आताच्या विधेयकाने 'दशकाचा व शिक्षणाचा दर्जा सुधारेल व त्या धंद्यात शिरलेले दुष्ट प्रघात नाहीतसे होतील, असे वाटते. असे असूनही त्या विधेयकाचे निमित्त पुढे 07 बेकायदा चळवळ करण्याचा विचार काही राजकीय व सांप्रदायिक पुढा-यांनी चालविला. कम्यनिस्ट करितील तेवढे चांगले हे जसे सत्य नव्हे, जस ते करितील तेवढे वाईट, हेही सत्य नव्हे. आजचा समतावाद जो काही असा काही राज्यांत दिसतो. तो संपूर्णतया स्वसंघाइतकाच व्यापक आहे. बध मानवसमाजाला ते तत्त्व निष्ठेने लावण्याचा अजून प्रयत्नच झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. वर्तमानपत्रे, रेडियो, पुस्तके ह्यांद्वारे "Yoया ध्येयवादांचे पांघरुण घेणारी राष्टे व व्यक्ती इतक्या जोराचा | करीत आहेत की, सत्यान्वेषण करणे जवळ जवळ अशक्य होऊन ल आहे. ज्या धर्माचा आपण शोध करीत आहो, त्याचे काहीसे आकलन यासाठी सत्यान्वेषणाची तयारी पाहिजे. नुसत्या कृतीला ज्ञानाची 7 नाही; पण ध्येय ठरवून साधनांची निवड करण्यासाठी ज्ञानाची म्हणजे जे आहे ते’ (सत्य) समजून घेण्याचे आहे ते’ (सत्य) समजून घेण्याची आवश्यकता आहे; आणि 'जे त' एका दृष्टीने नित्य पण एका दृष्टीने सदैव बदलते असल्यामुळे आवश्यकता नाही; पण आहे ते'। १०९ || संस्कृती ||