या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णाची. त्यात मधूमधून वैश्य राजे होणार आणि क्षत्रिय जमीनदार असणार. ब्राह्मणांना नैतिक अधिकार व धार्मिक अधिकार फक्त शिक्षणाचा आणि यज्ञयागाचा. या अधिकारावर स्वतः ब्राह्मणही कधी संतुष्ट नव्हते. त्यांनी पुन्हापुन्हा राजे होण्याचा, जमीनदार-सावकार होण्याचा, व्यापारी होण्याचा प्रयत्न केला आहे. जी समाजरचना व्यवहारात तोडण्याचाच उद्योग ब्राह्मणांनी केला, आणि जिच्यात तीन वर्षांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तिचे वर्णन युरोपियन संशोधकांनी ‘ब्राह्मणिझम' असे केले आहे. कारण त्यांना आपले धर्मगुरु दिसत होते, तसे येथले धर्मगुरु दिसत होते. जेते असल्यामुळे ज्यांना स्वतःची समाजरचना एकमेव आदर्श वाटत होती, त्यांना इतर व्यवस्थांचे गुणही कळणे शक्य नव्हते, आणि काळाच्या ओघात आज जे दोष म्हणून दिसत आहेत, ते एके काळी गुण होते, हेही कळणे शक्य नव्हत. या वातावरणात ठळक नसणा-या बाबींच्याकडे लक्ष वेधण्याची पद्ध कुणीतरी स्वीकारण्याची गरज होती. ते काम इरावतीबाईंनी केले. पण केवळ लक्ष वेधणे पुरेसे नसते; या पद्धतीने हाती आलेल्या सूत्रांचा अन्वयार्थ सांगणेही महत्त्वाचे असते. यामुळेच संशोधनक्षेत्रात इरावतीबाई अतिशय जपून विधाने करीत असताना दिसतात. याचे साधे उदाहरण पहावयास तर त्यांनी वापरलेले 'पितृनिवासी पितृपरंपरेची समाजरचना' व मातृनिवा मातृपरंपरेची समाजरचना' हे शब्दप्रयोग पाहता येतील. समाजशास्त्र लाडके शब्द 'मातृसत्ता' आणि 'पितृसत्ता' हे होते. पितृसत्तेत ज्या पुरुषांची सत्ता आहे, त्याप्रमाणे जणू काही मातृसत्तेत स्त्रियांची सत्ता । असा काही जणांनी उगीचच ग्रह करुन घेतलेला आहे. बहुपत्नीकत्व अ म्हणजे त्या समाजात स्त्रियांची गुलामी असते, अशी एकदा समजूत म्हणजे बहुपतिकत्व असणा-या समाजात पुरुषांची गुलामी असेल, उगीचच वाटू लागते. अनेक बायका करण्याची चाल आणि स्त्रि गुलामी या दोन घटना एकत्र होत्या, पण त्या एकमेकींचे कारण ज्या समाजात अनेकजणांत मिळून एक बायको सामायिक असे, बहुपतिकत्व असणा-या समाजात स्त्री ही गुलामच होती; एकपत्नीक १३० झाली. ची गुलामी असेल, असे क असे, अशा ; एकपत्नीकत्वाचे ।। संस्कृती ।।