या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एखाद्या शतकात सर्व भारत खिस्ती करणे शक्य होऊन जाईल, असे मॅक्सम्युलरला वाटत होते. असल्या प्रकारच्या समजुती बाळगणारा मॅक्सम्युलर एकटा नव्हता. इतरही अनेकांच्या मनात असे अनेक हेतू वावरत होते. पण हे मनातले अवांतर हेतू नजरेआड केले, तरी या संशोधकांना ठळकपणे दिसणारी पहिली बाब हिंदूंची जातिव्यवस्था आणि हिंदूंच्यामध्ये असणा-या चालीरितींची विविधता ही होती. आणि दुसरी ठळकपणे लक्षात येणारी महत्त्वाची बाब हिंदूंच्या धार्मिक वाङ्मयाची होती. हे सारे वाड्मय वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करीत होते. एन्थोवन, रिस्ले नंतर हटन यांच्या डोळ्यांसमोर असणा-या निगमनात्मक चर्चेला आधारभूत ठरलेल्या या दोन बाबी होत्या. ठळकपणे दिसणा-या बाबींवर या संशोधकांनी आरंभीच्या काळात भर दिला, ही गोष्ट स्वाभाविक झाली. हिंदूंचेच धर्मवाड़मय असे सांगत होते की, सगळा समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चार वर्णावर आधारलेला आहे. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात असे म्हटले आहे की, त्या विराटपुरुषाच्या तोंडापासून ब्राह्मण, बाहूंपासून त्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शुद्र जन्माला आले. भगवद्गीतेत भगवतांनीही चातुर्वर्ण्य आपण निर्माण केले असल्याची व ते गुणधर्म आधारलेले असल्याची घोषणा केलेली आहे. वर्णसंकराची कल्पना होती; सर्व पौराणिक वाड्मयात होती आणि स्मृतिग्रंथांत वर्ण जाती निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. अभ्यासाला प्रारंभ कोणत्याही अभ्यासकाला हाती लागणारे असे हे साहित आधारे स्पष्टीकरण करीतच बहुतेक सर्वजण वाटचाल करी ली, ५पा वर्णव्यवस्था होती. या वर्णव्यवस्थेतून जाति नी दिले असे मत जुन्या, मधल्या आणि नव्या अशा संश आणि आस्था आहे. ज्यांना हिंदुधर्माविषयी, हिंदूंच्या परंपरेरि [क्तिवाद निर्माण होती, त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करण्य' गातील कोणत्याही केले. चार्तुवर्य हिंदुस्थानातच आहे आहे, हा एक असाच देशातल्या कोणत्याही समाजव्यवस्थे) १३९ || संस्कृती ।।