या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाजसुधारकांचा एक गट आणि समाजशास्त्राचे विवेचन करणा-यांचा एक गट यांनी मिळून ब्राह्मणांच्याविरूद्ध जो प्रचंड आततायी आक्रोश केलेला आहे, त्याच्या ध्वनिप्रतिध्वनींनी भारतीय वातावरण एक शतकभर भरले गेलेले आहे. वर्तमानकाळात गुलामगिरीच्या समाजव्यवस्थेचे नानाविध धूर्त युक्तिवादांनी समर्थन करणा-या ब्राह्मण विद्वानांना ही जी शतकभर चौफेर शेणमार झाली, त्याविषयी माझ्या मनाला फारशी खंत नाही. वर्तमानात जे गुलामगिरीचे समर्थन करतात, त्यांच्या डोक्यावर जर भूतकाळातील सर्व घोर पापांचे ओझे लादले, तर वैचारिक चर्चेत येथे सत्यापलाप होतो आहे, एवढेच माझे म्हणणे आहे; बाकी तक्रार कोणतीही नाही. आणि सत्यापलीकडे लक्ष्य वेधण्याचेसुद्धा कारण इतकेच की, ब्राह्मणांवरील धूळफेक ब्राह्मण बाजूला टाकण्याला उपयोगी पडते, पण सामाजिक गुलामगिरीचा जो मूळ प्रश्न त्यांच्या सोडवणुकीला या कचराकुंडीची तपासणी फारशी उपयोगी ठरत नाही. । | सामाजिक चिंतनात अडचण असेल, तर ती या ठिकाणी आहे. ज्यांनी मणाना गुलामगिरीबद्दल दोष दिला, समाजाला मागासलेले "ठेविल्याबद्दल पाष दिला, त्यांनी ब्राह्मणांजवळ ज्ञान होते, हेही मान्य केले. ब्राह्मणांनी समाजव्यवस्था निमार्ण केली, हेही मान्य केले. जे ब्राह्मणांचे समर्थक होते यानी ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्याच कमरेला आहेत, असे सांगताना उही ब्राह्मणांजवळ ज्ञान होते, असेही सांगितले व ब्राह्मणांनी समाजव्यवस्था 'माण केली असेही सांगितले परस्परविरोधात उभ्या राहणा-या दोन गटांची ३० भूमिका पुन्हा एकच आहे. अडचण अशी आहे की, ती मूळ भूमिका उचा आहे. ब्राह्मणांनी ज्ञान कोंडून ठेविल्यामुळे समाज मागासला जावा 7 कोडून ठेवण्याजोगे ज्ञानच ब्राह्मणांच्याजवळ नव्हते, हे सत्य आहे. फाडून ठेवण्यासाठी ब्राह्मणांच्याजवळ श्राद्धपक्ष, व्रते, उद्यापने, यज्ञयाग व ज्ञान होते. हे ज्ञान समाजात ब्राह्मणांनी उधळून दिले असते, 3Vत असते. तरीही समाजाचे मागासलेपण तसेच शिल्लक राहिले 71. ब्राह्मणांनी ज्ञान कोंडले नाही. समाजोपयोगी ज्ञान ब्राह्मणांच्याजवळ १४३ || संस्कृती ।।