या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्यच नाही. लोकानुरंजन- क्षणाक्षणाला मन बदलणाऱ्या लोकांचे रंजन हे राजकारणी पुरुषांच्या हातचे एक महाभयंकर साधन आहे. त्यामुळे मनुष्य अधिकार प्राप्त करून कुठच्याकुठे वर जाऊ शकतो, त्याचप्रमाणे हा प्रवाह विरुद्ध गेला तर सर्वस्वाला वंचित होऊन तो गर्तेत जाऊन पडण्याचीही शक्यता असते. लोकानुरंजन हे साध्य होऊच शकत नाही. ते सदैव एक साधनच राहते.
 सीता गेली. कुशलवांना राज्य मिळाले. सीतेचा हा शेवटचा क्षण पतिभक्तीचा कळस म्हणावयाचा का मातृत्वाचा शुद्ध अविष्कार म्हणायचा?

- १९७०

।। संस्कृती ।।

५३