या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. + दीक्षा अलोलिक , मिथ्या स्त्रीपुरुष मायिक | विषयसुख भ्रम मात्र ॥ ३६॥ आनंदाचे उपस्थ एकायतन । हे काय मिथ्या वचन । ते अर्थी पूर्ण वेदज्ञ । वेदविवंचना दाविती ऐशी ॥ ३७॥ पुसतां साखरेची गोडी कैशी । तो स्वादु नये सांगावयासी । तेथें चाखों देती अणुमानशी । तेचि गोडपणराशी जाणती जाण ॥ ३८ ॥ तेवी परमानंदसुखप्राप्ती । उपस्थद्वारा नर चाखिती । आनंद एकायतनस्थिती । बोलिल्या उपस्थीं या हेतु वेदें।॥३९॥ त्या उपस्थसुखाची नित्यस्थिती । संभोगेंवीण जे वाढविती । तेथ मिथ्या स्त्रीपुरुपव्यक्ती । सहजें होती सज्ञान ॥ ४४० ॥ चाखिली गोडी तेचि सासर । परमानंद मैथुनमात्र । मानूनियां मैथुनपर । जाहले पामर विपयांध ॥४१॥ उपस्थीं परमानंदगोडी । यालागी स्त्रीकामाची अतिवोढी । सदा सोसिजे महामूढीं । ताडातोडी जीविताच्या ॥ ४२ ॥ साखरेचे केले नारियेळ । तेथ त्वचा गर्भ साखरचि केवळ । तेवी विषयद्वारा सुखकल्लोळ । उठती सकळ परमानंदें ।। ४३ ॥ नाना पक्वान्नपरवडी । गुळाच्या गोड्या ते चवी गाढी । तेवीं विपयाची जे जे आवडी । ते ते गोडी निजानंद ॥४४॥ हे नेणोनि मुळींची निजगोडी। सोशिती विषयाच्या अतिवोढी । बाप सद्गुरुकृपा गादी । विषयांची आवडी एकत्वा आणी ॥ ४५ ॥ यालागी विषयांची आस्था । न चढ़े सच्छिष्याचे माथा । स्त्रीभोगाची आसकता। मिथ्या तत्वतां गुरुवाक्यनिष्ठा ॥४६॥हा आत्मा हे आत्मी पाही । ऐसें मिथुन मुळी नाहीं। ते निजमूळ पाडिता ठायीं । ब्रह्मचर्य पाहीं अभंग ॥४७॥ या नांव गा निजनैष्ठिक्य । ब्रह्माचर्य अतिसुटंक । सद्गुरूनी वोधिले निष्टंक । अलोलिक अभंग ॥४८॥ आतां अहिंसेची स्थिती । ऐके राया चक्रवर्ती । भवई उचलणे नाहीं भूती । स्वम सुषुप्ती जागतां ।। ४९।। पौवो आदळतां देख । झणीं पृथ्वी पावेल दुःख । या काकुलती आवश्यक । पाउले अलोलिक हनुवार ठेवी ॥ ४५० ॥ आकाग दचकेल देख । यालागी नेदी सरी हाक । वाचा परिपकपीयूख । वचनें परम सुख सर्वांसी देतु ॥ ५१ ॥ त्याचा शन्दु जै गगनीं भरे । तेणे शब्दानंदचमत्कारें । गगनचि निजसुखें सुभरे । येणे सुखोद्गारे वचनोक्ती ।। ५२ ॥ जळामाजी घालिता उडी । झणी उदक दडपे वुडीं । तरगन्याय देणे बुडी । जीवनाची दुथडी न हेलावता ॥५३ । त्यासी जळी होता निमम । जळाचा तापु शमे सपूर्ण । यापरी करी स्नान । जीवनों जीवनु निववितु ॥ ५४॥ झणी दुःख पावेल धारा । ह्मणोनि श्वासु न घाली सैरा । नेमुनी प्राणसचारा । निजशरीरा वागवी ।। ५५ ॥ निजदेहा करावया घातु । सर्वथा जेवीं नुचले हातु । तेवीं भूतांवरी निघौतु । ज्याच्या पोटातु उपजेना ॥ ५६ ॥ अत्यत न्यौहारे पाहतां । वचकु पडेल प्राण्याच्या चित्ता । यालागी बाह्यदृष्टी क्रूरता। न पाहे भूता भूतभावें ।। ५७ ।। रोम रगडतील संपूर्ण । यालागीं न करी अगमर्दन । एवं स्वदेहाचे देह १ विपर्यद्रिय २ माहेरपर ३ सर्व जीवाचा निखानुभव आहे की सभोगराळी सुसमाप्ति होते, पण ते सुख इंतपणाच्या बुद्धीने देदोपाधीमुळे मान मिळतें, परमात्ममुसाची प्राप्ति रुपाधिक आहे ४ आटाआटीन ५ नारिकेल, नारळ ६ पकाप्रांचे प्रसार, तन्हा ७ गोडी, गोदीमुळे ८ सपन, अफाट ९ मोठी १० उत्स्ठा ११ वालिंगीशद १२ मुचिन्हित १३ निषित १४ रागात पाहणं १५ पाय १६ हलु, मृदु १७ मन माने तशी १८ अमृताप्रमाणे गोट १९ परिपूर्ण होते २० काचित् २१ पाण्याची २ आगास लागटेख्या पाण्गों सर्वच पाणी शीतल करीत, आपल्या स्पर्शन जागा ताप निवारीत २३ नियमित करून, दूरदर्शी २४ आधान २५ घरज्या नजरेन, न्याहाळून २६ भीति