या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. माया जीवित्व घेऊन पळे । भक्त तरती भाळेभोळे । हरिभजनन महामाया ।। ६२० ॥ करितां नारायणाची भक्ती । निजभक्त सुखें माया तरती । ते नारायणाची मुख्य स्थिती। स्वयें चक्रवर्ती पुसतु ।। २१ ।। राजोवाच-नारायणामिधानस्य ब्रहण परमात्मन । निष्ठामईथ नो वक्त यूय हि महा वित्तमा ॥ ३५॥ सर्वांभूती भगवद्भावो । हा मुख्य मायातरणोपायो । आइकोनि सुखावला रायो । तेणे आनंदें पहा हो परब्रह्म पुसे ॥ २२ ॥ करिता नारायणाची भक्ती । उत्तम भक्त माया तरती । ते नारायणाची निजस्थिती । साक्षेपें नृपती पुसतु ॥ २३ ॥ ब्रह्म परमात्मा नारायण । वस्तूसीच ह्मणणे जाण । ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण । राजा आपण पुसतु ॥ २४ ॥ सकळांमाजी अधिष्ठान । सबाह्य ज्याचेनि परिपूर्ण । त्या स्वरूपातें नारायण । स्वयें वेदज्ञ बोलती ॥ २५ ॥ तुह्मांऐमे ज्ञाननिधी । भाग्य जोडलेति त्रिशुद्धी । तुमच्या वचनामृतबोधी । अहंबुद्धी उपजेना ॥ २६ ॥ तुमचिया वचनोक्ती । चोसडली स्वानंदस्फूर्ती । लांचावली चित्तवृत्ती । श्रवणे तृप्ती कदा न मनी ॥ २७ ॥ ऐकोनिया रायाचा श्रेष्ठ प्रश्न । प्रबुद्धाधाकुटा पिप्पलायन । तो बोलावया आपण । स्वानंदें पूर्ण सरसावला ॥ २८ ॥ पिप्पलायन उवाच--स्थित्युद्भवप्रायहेतुरहेतुरस्य सम्बनजागरसुपुप्तिषु सदाहिन । देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन सजीवितानि तदवेहि पर नरे द्र ॥ ३५ ॥ अगा ज्याचेनि उपजे उत्पत्ती । त्याचेनि अंग स्थितीसी स्थिती । ज्याचेनि प्रळया प्रळयशक्ती । ऐसा जो त्रिजगतीं मुख्य हेतू ॥२९॥ यापरी जोजगाचा हेतू स्वयें स्वसत्ता हेतुरहितू। सच्चिदानंदें सदोदित् । तो जाण निश्चितू नारायणु ॥ ६३० ॥ जेवीं सायप्रातमध्याह्न । तिही काळी अलिप्त गगन । तेवीं उत्पत्ति-स्थिति-प्रळयीं जाण । समान नारायण परमात्मा ॥ ३१ ॥ उत्पत्ति-स्थिति-मळयात । ह्मणसी कोण देखे येथ । तेचि अर्थाचा दृष्टात । स्फुरदर्थ अवधारीं ॥ ३२ ॥ जागृती स्वम आणि सुपुप्ती । तिन्ही व्यापूनि समाधीही परती । ज्याची साक्षित्वे स्फुरे स्फूर्ती । तो जाण निश्चिती नारायण ॥ ३३ ।। जागृतीचे जाणपण । स्वमाचें मिथ्या भान । सुपुप्तीचा साक्षी पूर्ण। तो नारायण निश्चित ॥ ३४ ॥ एवं परमात्मा परंज्योती । आत्मा हृदयस्थ निजगतीं । त्याते नारायण ह्मणती । जाण निश्चिती नृपनाथा ॥ ३५ ॥ ऐसी सागता ब्रह्मस्फूर्ती । अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती । सहजे ब्रह्म आतुडे हाती । ऐक ते उपपत्ती सागेन ॥ ३६ ॥ तरी परमात्मा ब्रह्ममूर्ति पूर्ण । तुझे हृदयीं नादे आपण । ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रिय जाण वर्तती ॥३७॥ नयने तेणे तेजे देखणे। रसना तेणे स्वादें चाखोजाणे। श्रवण तेणें अवधाने । शब्दज्ञान प्रबोधिती॥३८॥ तेणे अहंकारांअहभाव । तेणेचि मनासी मंतव्य । तेणेचि चित्तासी चेतव्य ।बुद्धि बोद्धव्य तेणे ब्रह्मावबोधे ।। ३९ ॥ तेणें जड देह सचेतन । तेणेचि कळे मृदु कठिण । तेणेचिचरणाच्या ठायीं गमन । करी करमण त्याचिये सत्ता॥ ६४०॥त्याचेनि प्राण परिचरती। त्याचेनि निमिषो १जीव २ बुद्धिपूर्वक ३ परमात्म्याचे अस्तित्व व स्थिति ४ आधार ५ निश्चयाने ६ मी अमुक अशी कल्पनाच कुरत नाहीं ७ भरुन आली ८ सयकली, लुध झाली ९ पुढे झाला १० प्रतिपाळे स्थिती ११ तीनही लोकी १० आपल्या सत्तन १३ सद, चित् , आनद या तिहींनी सर्वकाळ परिपूर्ण, १४ ज्यात सष्ट, अर्थ आहे असा १५ पलीकडे १६ मुरय ज्योत, की जेथल्या ठिणग्यानी सर्व भूतें सजीवपणे विचरतात. १७ 'ईश्वर सर्वभूताना हदेशेऽर्जुन तिछति' (गीता १८-६३) १८ ब्रास्थिती. १९ सापडे २० युधि