या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ ६४,'अघ चिरिला चाभीडा । काळियाच्या कुटिल्या फडा। यमलोकी घेऊनि झाडा। आणिला रोकडा गुरुपुत्र जेणे ॥ ६५ ॥ जे प्रजा पीडूनि कर घेती । जया नावडे धर्मनीती । ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निळिले ।। ६६॥ एकां सैन्ये एका स्वांगें। एका वधवी ऑन प्रयोगें । एका गोत्रकलहप्रसगं । अग्रपूजायोगें एकांसी ॥६७ ॥ अधर्मा लावील सीके । धर्माचे वाढवील विर्क । हे अवतारकौतुक । राया तू आवश्यक देखशील पुढा ॥ ६८ ॥ जे 5 लोटेल अहोरात्र । तै तै करील नवे चरित्र । तया कृष्णसुखासी पान । भक्त पवित्र होतील ॥ ६९ ॥ साधूंसी स्वानंदसोहळा । नीचं नवा होईल आगळा। ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥ २७० ॥ तोचि बौद्धरूपं जाण । पुढा धरील दृढ मौन । तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥ ७१ ॥ तो तटस्थपणे सदा । प्रवर्तवील महावादा । तेणे वादमिसे सदा । वाढवील मदा महामोहातें ॥ ७२ ।। मोह उपजवील दुर्घटः । कर्म करवील कर्मठ । एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोख निजात्महित ।। ७३ ।। कैसे माजविल मत । वेद मिथ्या मानित । वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो || ७४ ॥ मोहें केला सर्वांसी छळ । एका ज्ञानामिमान प्रवळ । ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य मणौनी ॥७५ ॥ ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पूर्ण कळीची होय प्रवृत्ती । तेव्हा नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरपाय ।।७६॥ शूद्राहूनि अतिकनिष्ठ । ते राजे होती परम श्रेष्ठ । वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधमी ॥७७॥ अपराधेवीण वितंडे । भलत्यांसी करिती दंड । मार्गस्थाचा करिती कोड । करिती उदंड सर्वापहरण ।। ७८ ॥ अवळाचें निजवळ रौजा । तो राजाचि स्वयें नॉगवी प्रजा । ऐमा अधर्म उपजे क्षितिभुजा । तें गरुडध्वजा न साहवे ॥ ७९ ॥ जेव्हां स्वधर्माचे जिणे । अधर्मी लागे गाजणे यालागीं श्रीनारायणे । अवतार धरणे कल्की नामा ॥२८॥ तो शस्त्रधारा प्रवळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ । महामोहाचे मूळ । स्वये समूळ उच्छे. दील ॥ ८१॥ तेव्हा धर्माची पाहाट फुटे । सत्यासी सत्व चौपटे । तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटे राहटती सर्व ।। ८२ ॥ एवविधानि कर्माणि जन्मानि च जग पत्ते । भूगणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥ २३ ॥ , जयाची गा अनंत नामें । अनत अवतार अनंत जन्में । अनत चरित्रं अनंत कर्मे । अनं तोत्तमें हरिकीर्ती ॥ ८३ ॥ अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाही जन्मकर्मा । त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथे ॥ ८४ ॥ ऐशी अवतार १ लोंड फाइन २ काळिया मपाच्या फटा चचून ठचून काढल्या ३ भार झालेले ४ अन्य उपायानी ५ शिक्षा ६ सामग्रं, तेज ७ निस 'मना चोलण नीच मोशीत जाव' रामदास "या वपाळी सरिता । जैसी चढी लागे पाडसुता। तसी नीच नवी भजता । श्रद्धा दिसे" (ज्ञानेश्वरी अध्याय १२-३६) ८ चागले, सर ९ मोठा मोह १० ज्ञानाचा अभिमा बाळगणारे, ज्ञानच मोक्ष देणारा अस समजून क्माची निंदा करणारे ११ मोटा १२ भले त्यासी १३ अशक्त, दुवळे, अनाथ, आत्मसरक्षण करण्यास असमर्थं अशाचा सरक्षा प्राता असेल तो राजा सरा या चरणात राजाच उत्कृष्ट रक्षण नाथानी केले आहे. 'राजा प्रतिरजनात्' हे प्रसिद्धच आहे १४ हा शब्द खुबीदार आहे नागवी झणजे नम करी मायाच वन्न मुद्धा ठेवीत नाही, सर्वख हरण करतो १५ राजाना १६ अधर्मोनि १५ चौपट अधिक होते १८ सक्षिप्त, योडक्यात अगष्टुप् वृत्त सात लहान, झणून लहान, थोडें या अर्थी या शब्दाचा उपयोग करतात एखाद्या दरिदी पुरुषाची स्त्रो लाम रागाने मणते, "फिती मेले दरिद्र काटावें ! तुपाचे अतुष्टुप् झाले आहे घरात!" येथे सपण हा अर्थ आहे