या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ एकनाथी भागवत. । यताया रक्तवर्णोऽसौ चतुर्याहुनिमेखल । हिरण्यकेशस्त्रय्यारमा सुरुसुवाधुपलक्षण. ॥ २४ ॥ त्रेती.यज्ञमूर्ति पुरुषोत्तमु । रक्तवर्ण ज्वलनोपमु । पिंगटकेश निर्धूमु । देवदेवोत्तमु चतु_हू ॥ २४ ॥ तया यज्ञपुरुपा निर्मळा । निगुणाची निमेखळा । वेदत्रयीचा पूर्णमेळा । सूतींचा सोहळा तदात्मकची ॥ २५॥ चुकधापाणिग्रहण । हेचि तयाचें उपलक्षण । त्रेतायुगी नारायण । येणे रूपं जाण निजभक्त ध्याती ।। २६ ॥ त तदा मनुजा देव सर्वदेवमय हरिम् । यजन्ति विद्यया अय्या धर्मिष्टा प्रदावादिन ॥ २५ ॥ , तेचे जे मनुष्य जाण । त्रिवेदी करिती भजन । सर्व देवस्वरूप हरि पूर्ण । यापरी यजन त्रेतायुगीं ।। २७ ।। त्रेतायुगी सर्वही नर । वेदोकी नित्य सादर । सर्वही भजनतत्पर । धर्मिष्ठ धार्मिक जन ॥ २८ ॥ अष्टधा नामी नामस्मरण । गजरें करिती सदा पठण । तें नामाभिधान । ऐक राया ॥२९॥ विष्णुर्यज पृश्निगः सर्पदेव उरकम । वृपाकपिर्जयन्तश्च उरगाय इतीर्यते ॥ २६ ॥ विष्णु यज्ञ पृश्निजन्मा । सर्वदेव उरुकमा । वृपाकपि जयंतनामा । उरुगाय परमा नामें स्मरती ॥ ३३० ।। द्वापारी भगवद्ध्यान । ते युगींचे पूजाविधान । भक्त कैसे करिती भजन । नामस्मरण तें ऐक ॥३१॥ द्वापरे भगवान् श्याम पीतवासा निजायुध । श्रीवरसादिभिरश्च रक्षीरपलक्षित ॥२७॥ । छापरी घनश्यामवर्ण । अतसीपुष्पप्रभासमान । पीतांबरपरिधान । श्रीवत्सचिन्ह अंकित ॥ ३२॥ शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा । इही लक्षणी गोविदा । लक्षिती सदा निजभक ॥३३॥ त तदा पुरप मां महाराजोपलक्षणम् । यन्ति वेदतन्त्राभ्या पर जिज्ञासबो नृप ॥२०॥ शशांकछत्र आणि चामर । राजलक्षणी राजोपचार । यापरी द्वापरींचे नर । अतिसादर पूजेसी ॥ ३४ ॥ शीघ्र पावावया परात्पर । वैदिक तात्रिक पूजा मिश्र । तत्त्वजिज्ञासु करिती नर । भजनतत्पर या रीतीं ॥ ३५॥ ते काळींचे नामस्मरण । जेणे होय कलिमलदहन । त्या नामाचे अमिधान । ऐक सागेन नृपनाथा ॥ ३६ ॥ नमस्ते वासुदेवाय नम सपणाय च । प्रधुम्नायानिरुद्वाय तुभ्य भगवते नम ॥२९॥ वासुदेवा तुज लोटांगण । सकर्षणा तुज नमन । प्रद्युम्ना प्रणाम पूर्ण । अभिवंदन अनिरुद्धा ॥ ३७॥ नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने । विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नम ॥३०॥ नारायणा ऋपिवरा । महापुरुपा सुरेन्द्री । विश्वरूपा विश्वेश्वरा । महात्म्या श्रीवरा नमन तुज ॥ ३८ ॥ सर्व भूती तूं भूतात्मा । तुज नमो पुरुषोत्तमा । द्वापरी ऐशिया नामा । नृपोत्तमा सदा स्मरती ॥ ३९ ॥ त्या नामाच्या पाठा । तेणे देवासी सतोप मोठा। वेगी साडोनि वैकुंठा । धावे अवचटा कीर्तनामाजीं ॥ ३४० ॥ इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरम् । नानात विधानेन कलावपि यथा शृणु ॥३१॥ याही नामी स्तुतिस्तवन । द्वापरीचे करिती जन । आतां कलियुगींचे भजन । तंत्रोतविधान ऐकराया ॥४१॥ १अमीसारखा २ दांची परिवरणरज्जु ३ अमाहुति व घृत अमीत टाकण्याची यज्ञपाने हातात घेतली आहेत असा ४ वेदाच्या वचनाविषयी ५ ध्यान करितात ६ तागाच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण ७ परब्रह्माचें खरूप जाणण्याची इच्छा करणारे ८ या ओवीत नाथानी चार नामाबरोबर लोटागण,प्रणाम, नमन व अभिवदन हे शब्द योजल्यामुळे ओवी सुदर झाली आहे.