या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. । कचित् कचिन्महाराज द्रविडेषु च भूरिश । ताम्रपर्णी नदी यन्त्र कृतमाला पर्यस्विनी ॥ ३९॥ कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी । ये पिवन्ति जल नासा, मनुजा मनुजेश्वर । प्रायो भक्ता भगति वासुदेवेऽमलाशया ॥४०॥ विशे द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं । तेणेही तीर्थविशेष भुयी। ते ठायीं अतिउत्कट ॥५१॥ ताम्रपर्णीच्या तीरी । हरिभक्ती अगाध थोरी । कृतमालेच्या परिसरी । उत्साहकरी हरिभक्ति नादे ॥ ५२ ॥ निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पय प्राशनी । वृत्ति वाढे हरिचरणीं । भगवद्भजनी दृढ बुद्धी ॥५३॥ देसतां कावेरीची थडी। पळती पापांचिया कोडी । जेथ श्रीरगु वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उद्भट नांदे ॥५४॥ प्रतीचीमाजी देता वुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी । भजन वाढे चढोढी । भक्तीची गुढी वैकुंठी उभारे ॥ ५५ ॥ ऐकें नरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्नानी । अथवा पयामाशनीं । भगवद्भजनी दृढ वुद्धी ॥५६॥ या तीर्थाचें केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन । केल्या स्नान पयःप्राशन । भगवद्भजन उल्हासे ।। ५७ ॥ दर्शन स्पर्शन स्नान । या तीयींचें करितां जाण । वासुदेवी निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥५८॥ यापरी जे भगवभक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त । सुरनरपितरां पगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥ ५९ ॥ देवपिभूतासनृणा पितृणा न किकरो नायमणी च राजन् । सर्वात्मना य शरण शरण्य गतो मुकुन्द परिहत्य फर्तम् ॥४१॥ शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण सद्भावें रिघाल्या शरण जन्ममरण वाधीना ॥४६० ॥ जेथ वाधीना जन्ममरण । तेथें देव ऋपी आचार्य पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण ते झाले उत्तीर्ण भगवद्भजने ॥६१॥जो विनटला हरिचरणी । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवी परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणी निर्मुक्त ॥ २ ॥ सकळ पापापासूनी । सुटिजे जेवीं गंगास्नानी । तेवी विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणी भगवद्भक्त ॥ ६३ ॥ भावे करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उद्धरती । ऋपीश्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति स्वानंदें ॥ ६४ ॥ स्वानंदें भगवद्भक्ती । तेणे सर्व भूते सुखी होती । पुत्रं केल्या भगवद्भक्ति। आप्त उद्धरती मातापितरें ॥ ६५ ॥ सकळ देवांचा नियता । अतिउल्हासे त्यातें भजतां । देवऋणाची वार्ता । भगवद्भका बाधीना ।। ६६ ॥ ज्यांसी अनन्य भगवद्भजन । ते कदा नव्हती कर्माधीन । कर्म ज्याचे आज्ञाधीन । त्या हरीसी शरण जो झाला ॥ ६७ ॥ तो नव्हे कर्माचा सेवक । नव्हे देवाचा पाइक । नव्हे प्राकृताचा रक । अनन्य भाविक हरिभक्त ॥ ६८ ।। जो हरीचा शरणागत । तो कोणाचा नव्हे अकित । कर्माकर्मी तो अलिप्त । नित्यमुक्त ऋणत्रयासी ॥ ६९ ॥ वासुदेव सर्वां भूतीं । हे दृढ ठसावे प्रतीती । यालागी अलिप्स कर्मगती । सकळ ऋणनिर्मुक्ती भगवद्धता ।। ४७० ॥ खपादमूर भजत प्रियस्य त्यसान्यभावस्य हरि परेश । विकर्म यथोपतित कथचिडुनोति सर्व हृदि सनिविष्ट ॥ १२ ॥ साडूनि देहाच्या अभिमाना । त्यजूनि देवतातरंभंजना । जे अनन्य शरण हरिचरणां । १ भूमी २उत्कठा ३ दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध व पवित्र नद्या ४ आसपास ५जोरदार ६ चटाओटीने ७ ध्वज ८ उमे १ जलपानामध्ये १० देव पितर व ऋषि याच्या ऋणास ११ पराधीन १२ उद्धरलेले १३ मम झाला, रगून गेला. १४ नियामक, खामी १५ चाकर १६ आत्मसाक्षात्कार, १७ इतर देवांचे भजन