या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ एकनाथी भागवत कष्ट क्षयाचे ॥ ९८ ॥ दक्षे निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी । तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वासी उपेक्षुनी ॥ ९९ ॥ दक्षे शापिले चंद्रासी । क्षयरोगु लागला त्यासी । तेणे येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पै केले ॥ ३०० ॥ स्नानमात्र केवळ । क्षयरोग गेला तत्काळ । कळा पावला सकळ । गोभे निर्मळ निजतेजे ॥१॥ वय च तमिबाटत्य तर्पयित्वा पितृन सुरान् । भोजयित्योशिजो विमानानागुणवताधसा ॥ ३७ ॥ आमीही तेथ स्नान दान । पितृतर्पण देवतार्चन । करूं ब्राह्मणपूजन । जे संपन्न श्रुतिशास्त्री ॥ २॥ नाना परीची पक्वान्ने । गुणाधिक्य मिष्टान्न । देवां ब्राह्मणासी भोजने । नाना दानें विधानोक्त ॥३॥ तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोहला महान्ति वै । वृजिनानि तरिष्यामो दानामिरिवार्णवम् ॥ ३८ ॥ श्रद्धेचेनि नेटेपाटे । पाहूनि दानपाने चोखटे । दान द्यावे गोमटे । भूमी वोलटे जेवी वीज ॥४॥ ब्राह्मणाचे मुख ते क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र । ऐसे पाहूनि सुक्षेत्र । दाने विचित्र पेरावी ॥ ५ ॥ विनीततेची सेल चोल । श्रद्धेचे चाडै निर्मळ । शमदमादि वैल सवळ । ते तत्काळ जुंपोनी ॥ ६॥ ऐशिया बोजा परी । वीज पेरिलिया क्षेत्री । पीक पिकेल घुमरी । पुरुषार्थ चारी लगडोनी ॥ ७ ॥ त्या पिकाचेनि सवलें । पापें तरोनि प सकळे । जेवीं नावेचेनिया वळे । समुद्रजळें तरिजेती ॥ ८॥ श्रीशुक उवाच-एव भगवतादिष्टा यादवा कुलनन्दन । गन्तु कृतधियस्तीर्थ सन्दनान समयूयुजन् ॥ ३९ ॥ शुक ह्मणे कौरवनंदना । ऐकें परीक्षिती सजाना । कृष्णे दिधली अनुज्ञा । तीर्थविधाना प्रभासा ॥९॥ यादव उठिले गाढे । रथी जुंपिले जी घोडे । येर धांवती रांपुढें । चहूंकड़े लगबग ॥ ३१०॥ तनिरीक्ष्योद्धयो राजन श्रुत्वा भगवतोदितम् । दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्य कृष्णमनुव्रत ॥ ४० ॥ थोर वीरांचे चोभाट । गजरथांचे घडघडाट । द्वारकेमाजी न फुटे वाट । प्रयाण उद्भट प्रभासाशी ।। ११॥ हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती । उद्धवास आठबल चित्ती । कृष्णवदती देवासी ॥ १२॥ कुळनाशासी त्वरित । आजिपासूनि सुमुहूर्त । तोचि देवे प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित माडिला ॥१३॥ उद्धव कृष्णासवे संतत । कृष्णानुमते तो वर्तत । सुरसवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥ १४ ॥ असतां येय कृष्णनाथ । द्वारकेमाजी अतिउत्पात । उठिले ते मनोगत । जाण निश्चित कृष्णाचे ॥ १५ ॥ यादव नेऊनि प्रभासासी । अर्ध क्षणे नाशील यासी । जावया निजधामासी । हपीकेशी उद्यत ॥१६॥ ह्मणाल कां नेले इतुके दुरी । नाशु न करीच द्वारकापुरीं । तरी तो सर्वज्ञ श्रीहरी । सूत्रधारी जाणता ॥ १७॥ यादव देवांश निश्चिती । सातवी पुरी द्वारावती । येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हे जाणोनि श्रीपति न नाशी ॥१८॥ यासी आहे पदाभिमान । द्वारकेमाजी न घडे निधन । हे जाणोनि जगजीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥ १९ ॥ ब्रह्मशापाचे मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका । हैं कळलसे यदुनायका । तेध १ गोट अन २ देऊ ३ सामथ्याने ४ चागली ५ ओल झालेल्या ६ पालयिये पेढीवीण ह्मणजे पलम व धुध्यावाचून पेढ होणजे मुळा अगर बुधा, पेरणी करिताना वरची पालवी किवा अकुर तोडावे लागतात, मुन्या जमिनीत सोल गेल्या असतात त्या काटाव्या लागतात, पण प्राह्मणमुस है असे शेत आहे की ज्यात दाने पेरताना घरील आयास पडत नाहात ७ उत्तम नमी ८ धान्य पेरण्याचे साधन ९ कमावशीने १० जोराने ११ तीर्थविधि करण्यास १० गजवजन गेली १३ कृष्णाची देवाशी बोलाचाल १४ तत्पर १५गरण १६ लव्हाळा, मागे अध्याय १ आंची ३८१ पहा