या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ एकनाथी भागवत समूळ उपावो ॥१२॥ माझे स्वरूप सर्वगत । मना वाहेरी आणि आंत । जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ ते असे ॥ ९३ ॥ मजवेगळे जावयासी । ठावो नाहीं प चित्तासी । स्वदेशी हो परदेशी । अहर्निशी मजआंतू ॥९४॥ ऐसे निजरूप सतत । पाहतां थोरावेल चित्त । त्या चित्तामाजी आयंत । पाहें समस्त हे जग ॥ ९५ ॥ अथवा जीवस्वरूप तुझे चांग । त्यामाजी पाहतां हे जग । जगचि होईल तुझें अग । अतिनिव्यंग निश्चित ।।९६॥ चरे आणि अचरे । लहाने आणि कां थोरें । जीवरूपी सविस्तरे । पाहें निर्धारें तूं हे जग ॥९७ ॥ ह्मणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजी केची पहावे जगासी । त्यासी ऐक्यता करी मजसी । जेवी कनकेसी अळंकार ।। ९८ ॥ चिंतितां कीटकी भिगुरटी । तेचि ते होऊन उठी । तैसा तूं उठाउठी । होई निजदृष्टी निजतत्त्व ॥ ९९ ॥ हो कां सैधवाचा खडा । पडल्या सिंधूंमाजिवडा । तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥ १०० ॥ जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद । परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१॥ ज्ञानविज्ञानसयुक्त आत्मभूत शरीरिणाम् । आत्मानुभवतुष्टात्मा नान्तरायविहन्यसे ॥१०॥ शास्त्रश्रवणे दृढ ज्ञान । मननाभ्यासें होय विज्ञान । या दोहींची जाणोनि खूण । ब्रह्मसपन्न तूं होई ॥२॥ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तुझे पाये । ह्मणसी वोदयतील अतराये । त्यासी कार्य करावे ॥३॥ साडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख । जो मज भजे भाविक । विन्न देख त्या कैचें ॥ ४ ॥ त्याच्या विघ्ननाशासी देख । करी चकाची लखलख । घेऊनि पाठीसी अचुक । उभा सन्मुख मी असे ॥५॥ यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा । त्यासी विघ्न करावया देवा । नन्हे उठावा मज असतां ॥ ६ ॥ एवं ब्रह्मासपन्न जाहल्यावरी । आत्मा तूंचि चराचरी । जंगमी आणि स्थावरी । सुरासुरी तूंचि तूं ॥ ७ ॥ तुजहूनि कांहीं । अणुभरी वेगळे नाहीं । तेथ विघ्न कैचें कायी । तुझे ठायीं बाधील ॥ ८॥ ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी । पाठी थापटून हपीकेशी । उद्धवासी सागतु ॥९॥ ऐशी बाध्यवाधकता फिटली । सकल्पकल्पना तुटली । ब्रह्मानंदें पाहाट फुटली । वाट मोडली कर्माची ॥ ११० ॥ ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रक । वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारे ॥११॥ हेंचि "किती सागों कायी। मी त्याचा आज्ञाधारक पाहीं । प्रतिष्ठिती जे जे ठायी। तेथ पाही प्रगटतु ॥ १२ ॥ बचनमात्रासाठी । प्रगटलो कोरडे काष्ठी । दुर्वासा पाइला पाठीं । त्वांही दिठी देसिलें ॥ १३ ॥ ह्मणसी देवो ज्याचा आज्ञाधरू । कर्म त्याचे होय किंकरू । तरी ज्ञाते यथेष्टाचारू । विपयीं साचारू विचरती ॥ १४ ॥ ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण । तेही विषयींचे लक्षण । सावधान परियेसीं ॥१५॥ । १ उपाय २ विशाळ, व्यापक होईल ३ निर्दोष ४ जगम ५ मिठाचा ६ समुद्रामध्य ५ घरील आव्यात हेच सागितले आहे की, तू इद्रियसमुदाय व चित्त साधी ठेव व सार जग, भोक्ता जो जीव, त्याच्या माधारात राहाते समें समज जीवात्मा हा चराचर ब्रह्मरूपाच्या ठिकाणी आहे अशी दृष्टि टेव' ८ भराभवज्ञान ९ प्राप्त होतील १. फगची इच्छा ११ "घेयोटिया चक्रगदा । हाचि धदा करितो ॥ १॥ भका राखे पायापाशीं । दुजनासी सहारी" 10 ॥ तुकाराम १२ नेमका, न धुक्ता १३ उत्साह, सति १४ कामकरी, रोवर १५ कीर्ति १६ सायातून, प्रम्हासासाठी सम्मान प्रकटलों १७ वाहिला -- - - - - -