या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥३७ ॥ तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधे अंगी आदळतां । पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा निजशांति ॥ ३८ ॥ ऐशी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा । आवडता सर्व लोका । सुहृद् तो का सर्वांचा ॥ ३९ ॥ नवल संख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्री । स्वार्थी वंचनार्थं न करी । कृपापात्री उपदेशु ॥१४० ॥ अतर्क्स त्याची पाहती दिठी । मद्रूपे देखे सकळ सृष्टी । जगासी मज अभिन्न गाठी । निजहष्टीं वाधली ॥४१॥ मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहे । तो जरी मातें न पाहे । ते न पाहणेही होये मीचि त्याचें ॥ ४२ ॥ त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी । ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥४३॥ अवघे जगचि मी होये । तेव्हा तो मी हे भाप जाये। ऐसा तो मजमाजी सामाये । समसाम्यसमत्वे ॥४४॥ सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम । त्यासी पुढती कैंचे जन्म । दुख दर्गम ज्याचेनी ॥ ४५ ॥ मातेच्या उदरकुहरी । रजस्वलेच्या रुधिरामाझारी । पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी सर्सरण ॥४६॥ जे मातेच्या उदरीं । जंतु नाकी तोंडी उरी शिरी। विष्ठामूत्राचे दाथरी । नव मासवरी उकडिजे ॥ १७॥ जठराग्नीच्या तोडी । घालूनि गर्भाची उंडी । उकडरकडूनि पिडी । गर्भकाडी घेडिजेति ॥४८॥ ते गर्भाची वेदना । नानापरीची यातना । नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥ ४९ ॥ अवध्यांच्या गेवटीं । प्रसूतिवातु जो आटी । सर्वांगी वेदना उठी । योनिसकटी देहजन्म ॥ १५० ॥ ऐसे अपवित्र जे जन्म । ते न पावतीच ते नरोत्तम । जिहीं ठाकिले निजधाम । ते पुरुपोत्तम समसाम्य ॥ ५१॥ मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी । कळिकाळाते नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥ ५२ ॥ जेथ जन्म नाही जाहले । तेथ मरण न लगताचि गेले । ऐसे भजोनि मातें पावले । भजनवळे मभक्त ॥ ५३॥ कृष्ण उद्धवाते थापटी । ह्मणे वेगें उठी उठी । हेचि हातवंशी हातवटी । जन्मतुटी तेणे होय ॥ ५४॥ जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक । तैसे कृष्णवचनासी देख । उद्धवे मुख पसरिले ॥ ५५ ॥ का चंद्रकिरणी चकोर । जेवीं अत्यंत सादर । तेवी उद्धवाचा 'आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥ ५६ ॥हो का पक्षिणी देखोनि पिले । जाणोनि चारयाचे वेळे । सांडोनिया अविसाळें । मुख कोवळे जेवी पसरी ।। ५७ ॥ तेवीं देखोनि कृष्णमुख। उद्धवासी अत्यंत हरिख । श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूख सेवित ॥ ५८ ॥ . श्रीशुक उवाच-इत्यादिष्टो भगवता महाभागयतो नृप । उन्दर प्रणिपत्याह तत्वजिज्ञासुरच्युतम् ॥ १३ ॥ शुक ह्मणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता । उपदेशिले महाभागवता। ज्ञानकथा निजवोधु ॥ ५९ ॥ ते ऐकोनि उद्धव । श्रवणी थोर उठी हाय । कैसे बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥ १६० ॥ श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । ते निरूपण अतिगोड । जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥६१॥ आवडी कळवळे चित्त । धाली साष्टाग दडवत । हात जोडोनि पुसत । प्रेमळभक्त उद्धव ।। ६२॥ १ सात्विकाची २ फसवाफसप ३ जिकडेतिकडे ४ मिळून जातो ५ उदररूप गुहेमध्ये ६ जन्म, सचरण ७ उष्णतेमध्ये, उकाड्यात '८ गोळा ९ वाढिजती १० हात उगारणे "बहुतापरी ऐशी । अविद्या नाही आपेशी । भाता चोल हातवशी । क्वांवरी"-अमृतानुभव प्र. ६-४३ १७ हरिचरणी १२ पक्ष्याच घरटे 'का महाक्षी भविसाळें । पक्षिजातीची'-भानेश्वरी अध्याय ११-२५८