या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ एकनाथी भागवत. अविनाश । युक्तिप्रयुक्ती उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥ ८३ ॥ ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तुजवेगळा श्रीकृष्णनाथा । न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकी ।। ८४ ॥ एवं आत्मा तूं तत्त्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता । आत्मवोधी सस्थापिता । कृष्णनाथा तूं एकुः ॥ ८५॥ तसागवन्तमनवधमनन्तपार सर्वजमीश्वरमकृण्ठविकुण्ठधिष्ण्यम् । निर्विष्णधीरहमुह वृजिनामितलो नारायण नरसप शरण प्रपद्ये ॥१८॥ यालागीं जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्रमूर्ती । तुज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागी ॥ ८६ ॥ गोंवळाचेनि उच्छिष्टकेवळें । ज्याची पवित्रता न मैळे । तेणेचि उच्छिष्टवळे । गोवळे सकळ तारिलीं ॥ ८७ ॥ प्राणे शोपिले पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैसी । तेणेचि उद्धरिले तिसी । दो दोपांसी तारकु ।। ८८ ॥ करूनि कालियमदैन । मदिला त्याचा अभिमान । तरी मैळेना पवित्रपण । निर्वि जाण तारिला ॥ ८९ ।। रजक अंत्यज अत्यंत । आतळे तया अधःपात । त्यासी मारूनिया निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९० ॥ करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या निष्काम । तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ।। ९१ ॥ करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम । यालागी नामें पुरुषोत्तम । अकात्म निजवोधे ॥ ९२ ॥ जो आकळे गुणांआंत । त्यासी ते गुण करिती प्रात। त्या गुणांसी तुजमाजी अत् । यालागीं तूं अनंत सर्वथा ।। ९३ ॥ देशंतः कालतः पार । तुज न करवेचि साचार । यालागीं अनंत तं अपार । श्रुतीसी पार न कळेची ।। ९४ ॥ तुज म्यां करावी विनंती । किती यावे काकुळती । तं हदयस्थ ज्ञानमूर्ती। जाणता निजगतीं तू एकु।। ९५ ॥ ज्ञान अज्ञान मायाशक्ती। ईश्वराआधीन गा असती । त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति श्रीकृष्णा ॥ ९६ ॥ तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अको । ऐसा ईश्वरू तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥९७॥ देशतः कालतः स्वभावेसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी । तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णाशी अवतारु ॥ ९८ ॥ नराचे अविनाशस्थान । यालागीं तूं नारायण । तुझेनि जीवासी चणळवळण । चाळकपण तुजपासीं ॥ ९९ ॥ ऐसा ईश्वर तूं आपण । नरसखा नारायण । युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वा दिधले ॥२०॥ दारुण होतां सग्रामासी । पावडा पावो युद्धासी । तेव्हा ब्रह्मज्ञान सागसी । निजसख्यासी अर्जुना ॥१॥ ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तुज आलों शरण । त्रिविधता तापलों जाण । दुःख दारुण ससारु ॥२॥ ससार ह्मणजे अधकूप । माजी कामक्रोधादि दुष्ट सर्प । निदा स्पर्धा कांदे अमूप । दुःखरूप मी पडिलों ॥३॥ तेथ पडलियापाठीं। ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं । भरला जे उठाउठी । तेणे हिपुटी होतुसे ॥ ४ ॥ तेथून निघावया त्रिशुद्धी । उपायो न दिसे गा निजवुद्धी । कृपाळुवा कृपानिधी । आत्मवोधी मज काढीं ॥५॥ १ शकेचे समाधान २ उष्टे घास साऊन ३ कालीयसपांचा नाश ४ निषडत नाही, मस्त नाही ५ पुरषोत्तम का तर करिता मुकर्म बुक । ज्याची पविनता अनुत्तम आहे हाणून ह लक्षण फारच उत्कृष्ट पण गूढ आहे ६ वेष्टितात ७ मर्यादा तू देशकालानी अपरिच्छिन्न आहेस ८ सत्कीर्ति ९ विश्व चळतसे जेणें । परमात्मेनी-ज्ञानेश्वरी अध्याय १२११८ १० पायावर पाय देऊन वीर युद्धाला सिद्ध झाले ११ आधिभौतिक, आध्यात्मिक, व आधिदैविक तापा १२ अधार्चिताची भावद नाही, तिरस्कार १३ षष्टी १४ सर्वथैव १५ तत्त्वज्ञानाने AL