या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत भोगी ॥ २७ ॥ याचिपरी अनुमाना । परलोकभोगंभावना । आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ।। २८ ॥ के कृपा करील गोविंद । के तुटेल भवबंध। के देखेन तो निजबोध । परमानंद जेणे होय ॥ २९ ॥धांच पाव गा श्रीहरी । कृपा करी दीनावरी । मज उद्धरी भवसागरी । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३० ॥ जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधौलागी तळमळी । प्रेमपैडिभराच्या मेळी । देह न सांभाळी सर्वथा ॥ ३१॥ एक नेणोनि नरदेहा मुकले । एकी नव्हे ह्मणोनि उपेक्षिले । एक ज्ञानगर्व गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥ ३२ ॥ एक साधनाभिमाने ठकिले । एक करूं करूं ह्मणता गेले । एक करिता अंव्हाटां भरले । करणे ठेले तैसेची ॥ ३३ ॥ जरी विवेक कळला मना । तरी न तुटती विषयवासना । तेणे सतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितु ॥ ३४॥ कृष्ण ह्मणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी । तोचि आपुला गुरु आपणासी । विशेसी जाणावा ॥ ३५ ॥ त्याचिये निजवुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशी । तो स्वयें जाणे निजवोधासी । निजमानसी विवेके ॥ ३६ ॥ ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तसा देवो । ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धराया ॥ ३७ ॥ उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ । तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा ॥ ३८ ॥ पुरपये च मा धीरा सारययोगविशारदा । आविस्तरा प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपवृहितम् ॥ २१ ॥ एवं वैराग्य पूर्ण भरित । धीर पुरुप विवेकयुक्त । सांख्ययोग विचित । निजी निज प्राप्त तत्काळ ॥ ३९ ॥ नरदेही विवेक बसे । निजरूप पावले कैसे । जे शक्तियुक्त असे । ते सावकाशे देखती ॥ २४० ॥जे प्रसवे सर्वशक्तीते । ते सर्वशक्ति शक्तिदाते । जे नातळे सर्वशक्तीते । त्या स्वरूपात पाहताती ॥४१॥ उद्धवा काय सांगो गोप्टी। बहुत गरीरें सजिली सृष्टी । मज नरदेही आवडी मोटी । उठाउठी मी होतो ॥४२॥ ___ एकद्विनिचतुष्पादो बहुपादस्तथाऽपद । बहर सन्ति पुर सृष्टास्तासा मे पौरपी प्रिया ॥ २२ ॥ केली एकचरणी शरीरे । दोंपायाची अपारे । तीपायांची मनोहरे । अतिसुंदरें चतुप्पदें ॥४३॥ सपदि योनीच्या ठायीं । म्या चरणचि केले नाहीं । एके चालती वहपायीं । केली पाही शरीरें ॥४४॥ ऐशी शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केली ये क्षिती । मज कांत नेणती । मूढमति यालागी ॥ ४५ ॥ मज कर्त्यांची प्राप्ती । होआवयालागी निश्चिती । स्वाशे प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पारुपी प्रकृति म्या केली ॥ ४६॥ जेणे देहें मज पावती । त्या देहानी मज अतिप्रीति । यालागी श्रुति नरदेह चर्णिती । देव वाछिती नरदेहा ॥ ४७ ॥ ऐशी नरदेहाची 'प्रीती । कृष्ण सागे उद्धवाप्रती । येणे शरीरे मज पावती । नाना युक्तिविचारे ॥४८॥ १ स्वगंभोगाची कल्पना २ जळावेगळी ३ आत्मज्ञानासाठी 'जीवनावेगळी मासोळी । तुका तैसा तळमळी' ४ भगवत्नेमातिशयाच्या करहोगमध्ये 'प्रमगा या नाही देहाची भावना' अशी स्थिति होते ५ नटके ६ फसविले आउमागारा ८ सविवेक वैराग्य पाहिजे. विवेक सणजे नित्यारिलविवेक, बैराग्य हाणजे नाराक्त सृष्टीविपया अप्राति ९'ये यथा नो प्रपद्यते तात्तथैव भजाम्यहम' अशी गीतोक्ति आहेच १० ही ओवी गुदर आहे ११ दातविचाराने आपल्यामन्येच आत्मज्ञान होते १२ नरदेह १३ प्राप्ति