या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ एकनाथी भागवत. ॥ १४ ॥ ऐसा यदूचा संवादू । आवडी सांगे गोविंदू । उद्धवासी ह्मणे सावधू । हृदयीं बोधू धरावा ॥ १५॥ श्रीभगवानुवाच-यदुनेव महाभागो घमण्या सुमेधमा । पृष्ट सभाजित प्राह प्रश्रयायनत नृपम् ॥ ३१॥ . " श्रीमुखें श्रीकांत । यदूचे भाग्य वर्णित । ब्राह्मणभक्त सत्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धालू ॥ १६ ॥ भगवद्भाग्ये भाग्ययंतू । यदूसी भेटला तो अवधूतू । त्यासी होऊनि अतिविनीतू । असे विनवितू निजहिता ॥ १७ ॥ मृदु मंजुळ वचनी प्रार्थिला । मधुपर्कविधानें पूजिला । अवधूत अति सतोपला । बोलता झाला निजमुखें ।। १८ ॥ ब्राह्मण उवाच सन्ति मे गुरवो राज बहयो घुरगुपाश्रिता । यतो पुद्विमुपादाय मुक्तोऽटामीर तान् शृणु ॥३२॥ __क्षीरसागर उचंबळला । की कृपेचा मेघ गर्जिनला । निजसुखाचा वाधावा आला । तैसे चोलिला ब्राह्मणु ॥ १९ ॥ ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी । धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणी नियविले ॥ ३२० ॥ राजा आणि सात्विकु । सिद्धलक्षणे लक्षकु । पृथ्वीमाजीं तूंचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥ २१ ॥ सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न । पुसिले निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥ २२ ॥ गुरुवीण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती । ते गुरुही मी तुजप्रती । यथानिगुती सांगेन ॥२३॥ निजयुद्धीच्या विवेकस्थिती । वहुत गुरु म्या केले असती । जे जे सद्गुण म्यां देखिले भूर्ती । ते ते स्थिती तो गुरु ॥ २४ ॥ बुद्धीने अगीकारिले गुणा । निजधैर्य धरिली धारणा । तेणे मी मुक्त जाला जाणा । खेच्छा अटणा करीतसे ॥२५॥ ससार तरावया । मुख्य सदुद्धि गा राया । रिगर्मू नाही आणिका उपाया। व्यर्थ काह्या शिणावे ।। २६ ।। सद्बुद्धि नाहीं ज्यापासीं । तो ससाराची आंदणी दासी । उसत नाही अहर्निशी । दुःखभोगासी अनंत ॥ २७ ॥ सहद्धि नाही हदयभुवनी । तेथ चैराग्य नुपजे मनी । मा तो तरेल कैसेनी । विवेक स्वमी न देखे ॥ २८ ॥ वैराग्याचेनि पडिपाडे । ज्यासी सद्बुद्धि सांपडे । तेथ संसार कोण वापुडें । धायें रोकडें विभाटी ॥२९॥ आधी ससारु एक असावा । मग तो खटाटोपें नासावा । जो रिघाला विवेकगाया । त्यासी तेव्हा तो नाही ॥ ३३० ॥ संसारनागासी मूळ । सायं प्रज्ञाचि केवळ । तिचे जाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारू ॥३१॥जे मी गुरु सागेन ह्मणे । ते निजप्रज्ञेचेनि लक्षणे । हेयोपादेयउपायपणे । घेणेंत्यजणे सविवेकें ॥ ३२॥ हेचि महाठिया भौसा । सागेन तें सावध ऐका । जेणे शिष्याचा आवाका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥ ३३ ॥ ऐक.प्रजेची लक्षणे । सागेन दृष्टातपणे । सूप -- १ आपुल्या मुसाने २ सूचना, वार्ता 'पाही आत्मज्ञानमुदिनाचा । वाधावा सागतया अरुणाचा । उदय या वैराग्याचा । बावो पावे ॥ ज्ञानेश्वरी अध्याय १६-९०३ ३ स्थानदाचे कारण ४ प्राणिमानामध्ये ५ स्वरूप प्रहण करणारी युद्धि जाने बरी अध्याय २, ओव्या २३०-२४१ पहा ६ प्रवेश ७ कशारा ८ हा दृष्टात फारच मार्मिक आहे सत् जें परमात्मस्वरूप लाशी ज्याची बुद्धि लीन झाली नाही, त्याला कामगोधादि नानाप्रकारचे मनोविकार गारखे ठोकीत असतात, साला क्षणाचाही आराम न देता दुसाच्या टोहात टालून देतात, जसे राजवाड्यातले पुरुप आदण आरेल्या दासीला-राणीचं मन जिला अनुसूळ नाही अशा दासीला-चोपून निर्दयते। काम घेतात, राबपितात, तसे अवकास, फुरसद १. विचार ११ भराने १२ धाव मारून १३ ठार मारतों १४ शिष्य प्राज्ञचि. १५ त्याज्यप्रायाच्या उपायाने १६ भापेन १७ ताकद, शकि,