या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० एकनाथी भागवत यदूने सर्वांग केले श्रवण । अर्थी बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥ ५८ ॥ शब्द साडोनियां मागें । शब्दार्थामाजी रिगे । जे जे परिसतु ते ते होय अंगें । विकल्पत्यागे विनीतु ॥ ५९॥ भूतैराक्रम्यमाणोपि धीरो दैववशानुगै । तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्ष क्षितेनंतम् ॥ ३७ ॥ परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चिती । यालागी प्रथम गुरु क्षिती। निजशांतीलागूनी ॥ ३६० ॥ पृथ्वी गुरु विविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मैही । यांची लक्षणे धरितां देही । गुरुत्व पाही पृथ्वीसी ॥ ११॥ आतरनिग्रहो ते गाती । चायेंद्रियनिग्रहो ते दांती । उभयसहिष्णुता ते क्षांती । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥ १२॥ पृथ्वी ते नानाभूतीं । माझी माझी ह्मणौनि झोंबती । नाना भेदी भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारे ॥६३ ॥ त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण । मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥ ६४ ॥ तैसे योगियाचे लक्षण । करिता कर्म भिन्नभिन्न । वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥ देहासी अदृष्टयोगें गती । भूते अदृष्टयोगें आक्रमिती । भूती निजात्मता भाविती । द्वद्वे न बाधिती साधका ॥६६॥ येथ भूती पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठात्री गांजिली । हर्षविपादा नाही आली । निश्चळ ठेली निजक्षांती ॥ ६७ ॥ भूते पार्थिवेचि तंव झाली । तिही पृथ्वी पूजिली ना गांजिली । ऐक्ये द्वंद्वभावा मुकली । निश्चळ झाली निजरूपे ॥ ६८ ॥ तैसाचि योगियाही जाणा । भूतवैपम्ये डंडळेना । सर्वभूतीं निजात्मभावना । विपमी समाना भाविता ॥ ६९ ॥ आतां. पृथ्वीची अभिनव शाती । ते सागेन राया तुजप्रती । जे शाति धरोनि सती । भगवद्भक्ति पावले ।। ३७० ।। पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली । लातवरी तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥ तो अपराधु न मैनूनि क्षिती । सवेचि भूतांतें प्रसन्न होती । तेचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांते ॥ ७२ ॥ ऐसऐशिया निजशांती-। लागी गुरु म्यां केली क्षिती । ऐक सभाग्या भूपती । शातीची स्थिति अभिनव ॥ ७३ ।। एके अपराधु केला । दुजेनि उगाचि साहिला । इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ।। ७४ ।। ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी। पिळिलियाआलिलियावरी । स्वादाचिया 'थोरी अपकाया देतू ॥ ७५ ॥ अपराध साहोनि अगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं । तेचि शांती पै जगी । होय दाडगी निर्द्वद्व ॥७६॥ अपराध साहोनि अगावरी । अपराध्या होइजे उपकारी । हे शिकलो पृथियेवरी। परोपकारी पर्वत ॥ ७७॥ __ शश्वत्परार्थसर्वेह परार्थकान्तसम्भव । साधु शिक्षेत भूभृत्तो नगशिष्य परात्मताम् ॥ ३८ ॥ । पृथ्वीपासोनि जाले । ते पर्वतही म्या गुरु केले । त्यापासोनि जे जे शिकले । तेही १कान 'सागाचे कान केले' श्रवणार्थी परमोत्सुक झाला • पाहे ३ जमीन ४ द्वद्वसहिष्णुता-गीत, उष्ण, मुख, दुरा वगरे ५ निपयापासून बुद्धि निवृत्त होण हा शम, विधीच्या ददाने यात्रंद्रियाना आवरणे हा दम, 'आणि पृथ्वीचियापरी सर्वथा । सर्व जे साहणे' ती क्षाति अशी ज्ञानोबारायाना (अध्याय १८ ओवी ८४०) रक्षणे वाधली आहेत ६ सपादन करून देते ७ एकरूप ८ पृथ्वीपासून झाली ९ घाबरत नाही, मीत नाहीं १० आचर्यकारक शाती ११ नोगहा दुमग केली १२ लाथ मारून १३ न मानून १४ रम गाळून आटनिल्यावर १५ "नातरी इक्षुदङ । पारितया गोडा गाळिनया कडा नोहेचि जेगी।"-ताधरी अध्याय १२-२००.