या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ एकनाथी भागवत्त. जे देती त्यांसी यथाकालें । कृपावलें निवविती ॥ ३७॥ त्यांसी विषयो देतां का घेतां आसक्ति नाहीं सर्वथा । रसु शोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥ ३८ ॥ बुद्ध्यते स्पेन भेदेन व्यक्तिस्थ इव तहत । लक्ष्यते स्थूलमतिमिरास्मा चायस्थितोऽर्कवत् ॥ ५१ ॥ सूर्यो थिल्लरामाजी विवला । मूढ ह्मणती थिल्लरी बुडाला । त्याचेनि कंपें कंपु मानिला डहळे डहळला ह्मणती तो ॥ ३९ ॥ त्या थिल्लरातें नातळतां । गगनी अलिप्त जेर्व सविता । तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मी ।। ५४०॥ त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । ह्मणती योगिया देही नांदे । त्या देहाचेनि .नाना वाधे । स्वबुद्धिभेदें बांधिल ह्मणती ॥४१॥ त्यासी न देहाचे बाधित भान । हे न कळे त्याचें गुह्यज्ञान । दोराचे सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥ ४२ ॥ एवं आत्मा तो चिदाकाशी । मिथ्या देह मिथ्यात्वेंसी । विवोनि दावी देहकर्मासी । नव्हे ते त्यासी वाधक ॥ ४३॥ देखे आपणा जळी विंवला ! परी न ह्मणे मी जळी बुडाला । तैसा देहातीतु बोधु झाला । नाई भ्याला देहकर्मा ॥ ४४ ॥ देखोनि मृगजळाचा पूरू । मूर्ख करूं धांवती तारूं । तैस मिथ्या हा ससारू । भयंकरू मूर्खासी ॥ ४५ ॥ यालागी दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावं अतिप्रीती । येचिविषयी रायाप्रती । कथा कापोती सागतु ॥ ४६॥ नातिनेह प्रसङ्गो वा कर्तव्य कापि केनचित् । कुर्वम्विन्टेत सन्ताप कपोत इव दीनधी ॥५२॥ ससारदुःखाचें मूळ । स्त्रीआसक्तीच जाण केवळ । स्त्रीलोभाचें जेथ प्रवळ वळ । दुःख सकळ त्यापासीं ।। ४७ ॥ स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र । करिता दःखासी पात्र । ससारी नर होताती ॥४८॥ आसक्ति आणि स्नेहसत्र । या दोन्हींपासाव दुःख विचित्र । पदोपदी भोगिती नर । अस्वतंत्र होउनी ॥४९॥ यालागी भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं । अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिही भोगिजे ॥ ५५० ॥ स्नेहदुःखाची वार्ता । कपोताकपोतीची कथा । तुज सागेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५१॥ कपोत कश्चनारपये कृतनीडो वनस्पती । कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समा ॥ ५३ ॥ __ कपोतीचे स्नेह गोड । धरोनि स्त्रीसुखाची चाड । वनी वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीडै कपोता ॥ ५२ ॥ तेणे वनचरें वनस्थळी । नीडामाजी स्त्रीमेळी । वासु केला बहुकाळी । भार्येजवळी भूलला ॥ ५३ ॥ ____कपोतो स्नेहगुणितहदयौ गृहधर्मिणौ । दृष्टि ध्यागमङ्गेन बुद्धि वुझ्या बवन्धत ॥ ५४ ॥ ___ कपोता आणि कपोती । परस्परें दोघां अतिप्रीती । स्नेहो वाढलासे चित्ती । हृदयीं आसकी नीचं नेवी ।। ५४ ॥ हावभाव विलासस्थिती । येरयेराकडे पाहती । परस्परें कुरवाळिती । बोगिती येरयेरा ॥५५॥चेरयेरा वेगळे होणें । नाहीं जीवें अथवा मने । दोघे वर्तती एके प्राणे । खाणे जेवणे एकत्र ॥५६॥ शय्यासनाटनस्थानचार्वाकीदाशनादिकम् । मिथुनीभूय विसन्धौ चेरतुर्थनरामिषु ॥ ५५ ॥ सेविता ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडी । जीवेमाणे शिणोनि १शोपून २ सय ३ पाण्याचे उवल्यात ४ गढ़ळपणाने मळकट झाला ५स्त्रीपासून ६ परतन हाऊन, आपला सतन्त्रता मोड़न. घरटे, निद्रेमाजी तिस नवी १० एकमेकाच्या गळी पडतात. १५ श्रम करना