या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ एकनाथी भागवत. होतसे ॥४४॥ आमिपकवळे गुंतले मुख । मारितां देऊं न शके हाक । खस्तावेस्त करिता देख । बोलावया मुख त्या नाहीं ॥४५॥ हे माझे स्वजाती पहा हो । साडोनिया सुहृदभावो। मज का करूं आले अपावो । तो अभिप्रावो तो विवंची ॥४६॥ ह्मणे माझिया दुःसासी मुळ । मजपाशील आमिपकवळ । तो त्यजोनिया तत्काळ । सुखी सुनिश्चळ वैसला ॥४७॥ जेथ आमिपकवठु पडे । तेथ कलहाचा गोंधळ मांडे । परस्परें फुटती मुंडे । चिती तो. येरयेरा ॥४८॥ आमिप त्यजोनि बैसला देख । तो पाहे कलहाचे कौतुक । मूळ परिग्रहो तेथे दुःख । परम सुख त्यागिता ।। ४९ ॥ माझ्या गोपुरे धैवकारा । धनधान्य नाना अंवरा । रत प्रवाल धन पुत्रदारा । हा समुदायो खरा परिग्रहो ॥५०॥ या समस्त परिग्रहाचें मूळ देहबुद्धिं गा केवळ । तही अभिमाने सबळ । एवं सर्वांसी मूळ अभिमानू ॥५१॥ तो अभिमानू जै सांडे । तै प्रपंचाचे मूळ खंडे । मूळ छेदिल्या जेवीं उलंडे । अतिप्रचंडे तरुवर ॥ ५२ ॥ अभिमान देहबुद्धिजीवन । देहवुद्धि सगास्तव गहन । उभयसगू तो आयतन । निवासस्थान परिग्रहो ॥५३॥ एवं अन्योन्य सापेक्षक । येरयेरां आवश्यक । याचे त्यागी परम मुख । अतिदुःख तो परिग्रहो ॥ ५४ ॥ परिग्रहत्यागाचे मूळ जाण । आधी त्यजावा अभिमान । तेणेवीण त्यागु तो विटंबन । केल्या जाण होईल ॥ ५५ ॥ अभिमानसहित सकळ सांडे । तै पडती सुखाचे पायमांडे । तें सुख न बोलवे तोडें । शब्द मुरडे लाजोनी ॥ ५६ ॥ अभिमान जाऊन वर्तण । कैसे राया झणसी जाण । तें अर्भकगुरुत्वलक्षण । तुज सपूर्ण सांगेन ॥ ५७ ॥ न मे मानापमानौ तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् । आरमकी आरमरतिर्विचरामीह बालवत् ॥ ३ ॥ बाल माझे तुझें न ह्मणे। उंच नीच काही नेणे । यालागी मानापमान तेणें । सुखें साहणे सर्वथा ॥ ५८ ॥ तिमासाचेनि बाळकें । मानू कोण हैं नोळखे । अपमानू तोही न देखे। आपुलेनि सुखें क्रीडत ॥ ५९ ॥ दुजेपणाते नातळे । वालक आपुलियाचि ली । आपआपणियाशीच खेळे । आपुलेनि मेळे आपण ।। ६० ॥ देहगेहाची चिंता । वाळासि नातळे सर्वथा । स्वभावचि निश्चितता । चिंताकथा त्या नाही ।। ६१ ॥ न देखता दुजी स्थिती । वाळका आपुली आपणिया प्रीति । आपुली आपणिया अतिरती । तैशी गती योगिया ॥ १२ ॥ योगियासी प्रपंचाचे भान । सत्यत्वे नाही जाण । यालागीं मानापमान । दोन्ही । १ आरडाओरट २ 'एसनिपामिलापो हि बीज धरमहातरो' असे जयदेवपडिताने 'प्रमनराघवात' हाटलं आहे मुक्तेश्वरानी झाटलें आहे, "श्रेष्ठ, दुर्लभ जो पदार्थ । त्यापरी सकळाचीही भात । तेथें एकचि केलिया खार्थ । विरोध उपजे सहजचि ।" (आदि. अध्याय ४) ३ मस्तक, डोकी ४ मनोरे चुनेगची घरं ६ पोवळे ७ युद्धीपासून देहापर्यंत सर्व तत्त्वे ह्या सर्व तमाचा समुदायाला देहबुद्धि मटले आहे. मीपणा हा मीपणा सर्व तत्वात मिसळन गेला आहे व सर्वसमुदाय जी देहयुद्धि तिला हा एकवटल्यामुळे देहात्मय द्धि झाली देहबुद्धि ह्मणजे देहच मी हा निश्चय ही दोघ एकमेकाच्या साहारयावर यावली आहेत अहकाराला बुद्धीपासन दहापर्यंत सर्व तसाचा गाडा मिळाल्यामुळे तो अतिप्रबल याला आहे, व त्याचे साहाय्याने देहबुद्धीचा इतका बडेजाव झाला आहे सपब दे गत्मबुद्धि हा मुरय परिग्रह होय ९ स्थान १० सद्गुरुकृपेन ह्या जीवाला देहातीत स्थितीचा बोध झाला आणि ज्याप्रमाणे देहाव्यतिरिक सन जगाचे आपण साक्षी आहोत त्याप्रमाणे सर्व जग व हा देह ह्या सर्वोपासूा वेगळे होऊन आपण ह्या सर्वाचे साभी बनू , त्या वेळी परिग्रह जियू, व तें मुस कशा गफारच आहे ह शब्दाला सागता येत नाह ११ पायपल्या १२ सरण