या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ एकनाथी भागवत. वया ।। १२० ॥ ब्रह्मगिरी चिया कडा । शमदमे घालोनियां वेढा । प्रत्याहाराचा झगडा । पुढिले कडी लाविला ॥ २१ ॥ प्राणापानाच्या विवैरी । पहिली वोळखी होती सरी । माळ लाविली अभेदकरी । मन एकाग्री राखोनि ॥ २२ ॥ एकाग्रतेचेनि कल्लोळें । पुढारें न दळवे चालिले बळे । उल्हाटयंत्राचेनि मेळे । पर्चक्रपाळे भेदिले ॥ २३ ॥ वैराग्याची वज्रकवचे । निधडे वीर लेऊनि साचे । एकाग्रतावळे वळाचें । झळके ध्यानाचे करी खग ॥ २४ ॥ नवल खड्गाचा वाहो । लहान थोर निवंटी पहा हो । समुख आलिया सदेहो । न लगता घावो छेदित ॥ २५ ॥ निर्दाळूनि आळसासी । दासी केले निद्रेसी । ऐसे सावधान अहर्निशीं । योगदुर्गासी झोवती ॥ २६ ॥ रणरगींचे वीर गाढे । निजवळे चालिले पुढें । सत्रौवीचे पाणी वाढे । जितले रोकडे महावीरी ।। २७ ॥ तेथ युद्ध जाले चाग । कामादिक अरिपङ्घर्ग । रणी पाडिले अमोघ । सतेज खड्ग झळकत ॥ २८ ॥ ऐसे वैरी पाडूनि रणीं । प्राशिले सत्रावीचे पाणी । तंव अनुहताची सुडावणी । दुर्गामधोनी ऊठली ॥ २९ ॥ तेथ सोहवीराची एकाग्रता । होता भीतरील भेदूं आला हाता । दुर्गराखती अहंममता । मरो सर्वथा टेकली ॥ १३० ॥ यस्मिन्मनो लब्धपर यदेतच्छनै श मुंशति कर्मरेणून् । सस्येन वृद्धन रजस्तमश्च विधूय निर्वाणमुपैत्यनिन्धनम् ॥ १२॥ कामक्रोधादि महाशूर । पुत्र रणी पडले थोर । तेणे दुख अतिजर्जर । मरणतत्पर दिसताती ॥ ३१ ॥ ऐसी ऐकोनि दुर्गाची वार्ता । उल्हासु वीरांचिया चित्ता । उठावा दुगे सर्वथा घ्यावया ॥ ३२॥ निजधैर्य वीर अंदर निजसत्वे अतिउद्भट । पुढे निर्धारितां वाट । थोर अचाट देखिले ॥३३॥ कर्मरेणूंचे दुर्धर घाट । विधिवादे अवघड वाट । हळूहळू उल्लंपिता अचाट । समूळ सपाट तो केला ॥ ३४ ॥ पुढां रजतमांचे आगड । सोलपणे अत्यंत गूढ । घालूनि निवृत्तीचे दगड । सत्वे सुदृढ जिले ॥ ३५ ॥साचलू नव्हता वाहेरी। जिणोनि मनकर्णिकावोवरी । माळ चढविली ब्रह्मगिरी। ब्रह्मरधी उसळले ॥ ३६ ॥ तेय जैताची एक घायी । अनुहत निशाण लागले पाहीं । शोधितां परिखें कोणी नाहीं । केले ठायीं स्वयश ॥३७॥ तेथ रजतमाच्या वाटा । सहजे नाहत, विशुलनीशक्तीच्या सात जातात ५ १ सोह शब्दाचा मारा हा शब्द वाणीचा नसून वाणीरहित उन्चार आहे, 'पुढ सरी राम आधी पदावा' (समथ ) २ पूर्वमागास ३ भुयारात, गुप्तमार्गात हाच पश्चिममार्ग, याला पाणीचा मार्ग ह्मणतात पाठीचे मणक्यातून हा मार्ग आहे सुपुम्नेचा मार्ग हाच ४ एक्सटन प्राण व अपान एकरूपाने विवरमार्गाने जातात ५ पुढ माणापान असतात व त्याचे साहायास मन असते ६ सरता येत नाही ७ कुडलिनीशक्तीच्या साहायाने ८ सहा चक्राचा समुदाय सहा चके ---मूलाधार, खाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आणि अमिचक र ज्ञानप्राश होऊन अनुभवरूपी हसार हातात झळकते १० तलवार ११ व्यापार, पट्टा- १२ निपटी १३ सनावी जीवनकला ह्मणजे ब्रह्मरध्रातून जो अमृताचा त्रास होतो तो १४ अर्जिक्य १५ योगधारणेने दशनादाचा ध्वनि ऐकू येतो खाची १६ गजर, पनि "चद्रसूर्या बुझावणी । करूनि अनुहताचा सुडावणी । सतरावियेचे पाणी । जिक्ले वेगी" ज्ञानेश्वरी अध्याय १२५४ १७ गुप्त विचार १८ मोठे १९ प्रसिद्ध २० निश्चित करीत असता २१ क्माचे सूक्ष्म भाग ह्मणजे वासना अनत कमांची शशी उत्पन करण्यास एक्च मार्ग ह्मणजे वेदानी मागितलेला त्या मागान जाता जाता फर्मराशीच उापन झाले २२ सोन्यामधील वाट,रवणीची वाट २३ चाहूल २४ मनाचे घर सन्व, रज, तम या तीन गुणात मम राहते त्या तीन गुणांचे पलीकडे गेले झणजे मनाचा लय होतो त्या वेळी शुद्ध सरसगुण यरोवर असतो २५ मेरी, नगारा २६ दुसर,