या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ एकनाथी भागवत. जावों नेदी ॥ १६० ॥ तैसीच योगियाची गती । न साहे द्वैताची संगती । एकाकी बसे एकांती । जनाप्रती अलक्ष्य ॥ ६१॥ विपमाचा सगू न करी । परी समाचाही. सगू न धरी । निघे देहसगावाहेरी । त्वचेचे परी सर्पाचे ॥ ६२ ॥ सदा सावधानबुद्धी । लयनिमेप वायां जावो नेदी । अनुसंधान त्रिशुद्धी । तुटों नेदी सर्वथा ॥ ६३ ॥ सर्प विळामाजी रिघे वळे । मार्गी मागू देखती सकळे । धाला भुकेला हे त्यां न कळे । गेला कळे सर्वांसी ॥ ६४ ॥ तैसाचि योगियाही योगवळे । न राहे जनामाजीं जनमेळे । गुहेमाजी पडिला लोळे । एकला खेळे एकपर्णी ॥६५॥ हो कां योगियांचा आचार । करितां देखती लहान थोर । सविकल्पनिर्विकल्प विचार । न कळे साचार कोणासी ॥ ६६ ॥ एक हाणती कर्मठ । एक ह्मणती कर्मभ्रष्ट । एक ह्मणती आत्मनिष्ठ । कळेना स्पष्ट कोणासी ॥ ६७ ॥ सास बोलणेचि नाहीं । वोले तरी अल्प कांहीं । तैसाच योगिया पाहीं । वाग्वादी नाही सादर ॥ ६८ ॥ आंतुले कृपेचेनि वळें । बोले मृदु मंजुळ कोवळें । श्रवणासी दोर्दै एकवेळे । तेणें वचनमेळे निघाली ॥ ६९ ॥ बोलणे तरी अतिअल्प । परी छेदी सकल्पविकल्प । त्याच्या बोलाचे स्वरूप । सत्यसकल्प जाणती ।। १७० ॥ जो एकाकी उदास । ज्याचें परमार्थी मानस । तेणे गृहारभाची आस । वृथा प्रयास न करावे ।। ७१ ॥ __ गृहारम्भोऽतिदु साय विफलश्चाभुवात्मन । सर्प परकृत वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥ १५॥ मूळी गृहारभ तें दुख । कष्ट करिता दुःखकारक । निपजविले त्रिमाळिक । तें अधव देख सर्वथा ॥ ७२ ॥ जेथे ससारचि नाशवंत । देह प्रत्यक्षाकारें असत । तेथीचें गृह काय शाश्वत । मूर्ख मानित सत्यत्वें ।। ७३ ॥ जे गौच निमाले । ते उपजतां जातक केले । मृताचें जन्मनाव ठेविले । तैसे गृह केले असत ॥ ७४ ॥ तोही असतू आरभ कुडा । मृत्तिकेसाठी लावी झगडा । भांडवी दगडासाठी का लांकुडा । सुहृदभिडा सांडोनी ॥७५॥ वोळंवा घर करी सायासे । त्यामाजी सर्प राहे सावकाशे । न शिणता अप्रगसे । परघरवासे सतुष्ट ।। ७६ ॥ तैसाचि योगियाही जाण । न धरी देहगेहअभिमान । परगृही बसे निरभिमान । सुखसपन्न सर्वदा ।। ७७॥ एकही गृह न करावे । हे सत्य मानिले जीवे । एवढी सृष्टि केली देवे । वाचूं न पवे त्या केवी ।। ७८ ॥ सृष्टि रचिली कैसेनी । निपजली कोणापासूनी । येचि अर्थी गुरु कांतिणी । लक्षण लक्षुनि म्या केली ॥ ७१॥ _एको नारायणो देव पूर्वस्ष्ट स्वमायया । सहत्य कालकल्या करपान्त इदमीश्वर ॥ १६ ॥ नाराचे आश्रयस्थान । यालागी बोलिजे नारायण । जीवाचें तोचि जीवन । स्वामी नारायण सर्वाचा ॥ १८० ॥ ऐसा एक नारायण । तेणे पूर्वी जग जिलं जाण । उपकरण सामग्रीवीण । केले निर्माण जगाचें ॥८१॥ एकलेनि सामग्रीवीण । केवीं केले जग सपूर्ण । स्वमाया क्षोभवूनि जाण । करी निर्माण जगाचे ॥८२ ॥ ते निजमायेच्या पोटीं । असख्य जीवसामग्रीच्या कोटी । ते माया अवलोकिली दृष्टीं। तोचि उठाउठी निजकालू ॥ ८३ ॥ ऐशी निजमाया अवलोकिली । ते निजागावरी नादविली । परी अगी लागों नाहीं दिधली । हे अलिप्तता केली तो जाणे ॥ ८४ ॥ धुई दाटली आकाशी । आकाश नातळे (ईसी । सपाचे कातीप्रमाणे २ कान तृप्त झाले ३ तीनमजली घर 'तरी निमालि धवनगरें । करावी का'-ज्ञानेश्वरी अध्याय ५-११४ ४ नागवत ५ अगत्, अगत्य, नम्बर ६ मुग्या चार करतान व साप सात गायता जाऊन राहतो घोळया मणजे यानी नावाचे यारीक जीव असाही अर्थ माहे ५ साहित्य नसताही। ८ धुन