या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ एकनाथी भागवत. ॥२॥ एवं कर्माची चोदना । मद्भक्तासी नाही जाणा । करितां श्रवणकीर्तना । कर्मयधना नातळती ॥ ३ ॥ ऐशिया जिज्ञासावस्थेसी । कर्मवाधा नाही त्यासी । मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानासी । हेचि उद्भवासी सांगतु ॥ ४ ॥ __थमानभीक्ष्ण सेवेत नियमान्मत्पर फचित् । मदमिज्ञ गुरु शान्तमुपासीत मदारमकम् ॥५॥ होआवया वृत्तीचा उपरम । अहिंसासत्यादि धर्म । आचरावे अविश्रम । घाह्य नेम अविरोधे ॥ ५॥ आचरतां अहिसासत्यादिकांसी । तंव तंव दशा उजळे कैसी । अतिप्रीति गुरुभक्तीसी । अहर्निशी गुरु चिंती ॥ ६॥ सद्गुरूवीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण । हे उपनिषदर्थे प्रमाण । परम निर्वाण सांगीतले ॥ ७ ॥ डोळां देखणाचि आहे । त्यासी सूर्य नव्हतां साह्ये । सिद्ध पदार्थ देखों न लाहे । स्तब्ध राहे अधारीं ॥ ८॥नाव तारी हे साचार । माजी वैसले थोर थोर । परी तारकेंवीण परपार । समर्थ नर न पावती ॥९॥ पर्जन्ये भूमी मर्दिवा आली । वीजें कणिंग असे भरली । परी ज्ञातेन पेरणी नाही केली । तंव पिकाची बोली पोचट ॥ ११० ॥रत सापडले अवचितें । परी खरे खोटें सशय तेथें । रत्नपारखी करी मोलातें । अतियत त्यातें मग करिती ॥ ११ ॥ तैसे निजस्वरूप आइतें । श्रद्धा सेंद्गुरूचेनि हाते । खरें करूनिया ज्ञाते । निजसुखातें पावले ॥ १२ ॥ साधावया निजज्ञान । करितां सद्गुरूचे सेवन । निवाले सत सजन । आनंदघन सद्गुरू ॥ १३ ॥ ह्मणसी साधने केली अनेक । तैसे सद्गुरूही साधन एक । ह्मणतां मुमुक्षु जाला मूर्ख । निजात्मसुख बुडाले ॥ १४ ॥ सद्गुरु केला तो साधन । त्याहूनि परतें साध्य आन। हाणता आली नागवण । नागवला जाण सर्वस्वे ॥ १५ ॥ जो चित्सुखें सदा सपन्न । चिद्रूपें ज्यासी समाधान । तो चिन्मात्राहोनि भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥ १६ ॥ लवण सागरी रिघाले । तेव्हांचि तें समुद्र जालें । दीपें वणवया आलिंगिले । वणवाचि झाले ते तेज ॥ १७ ॥ एवं चिद्रूपाचें ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य सपूर्ण । गुरु ब्रह्म अभिन्न जाण । ये अर्थी प्रमाण उपनिषद ॥ १८ ॥ हो का घृताची पुतळी । नव्हता धृतपणावेगळी । घृतरूपें रूपा आली । तैसी मूर्ती जाली सद्गुरूची ॥ १९ ॥ तो चित्सुखाचा पुतळा । की सच्चिदानदाचा सोहळा । प्रत्यक्ष देखावया डोळां । धरी लीलाविग्रह ॥१२०॥ त्याची होआवया भेटी । पाहिजेती भाग्याचिया कोटी । हेळणेवरी दिसे दिठी । तैसी गोठी त्या नाहीं ॥ २१ ॥ सद्गुरु जेउती वास पाहे । तेउती सुखाची दृष्टि होये । तो ह्मणे तेथ राहे । महाबोधु लाहे स्वानदें ॥ २२ ॥ त्या सद्गुरूचे देखिल्या पाये । ताहानभूक तत्काळ जाये । कल्पना उठोचि न लाहे । निजसुख आहे गुरुचरणीं ॥ २३ ॥ त्या सद्गुरूचे लक्षण । सागतां शन्दु थोटावे जाण । जो सनातनं ब्रह्म पूर्ण । उणखूण त्या नाहीं ॥ २४ ॥ तन्ही स्फुरली एक स्फूर्ती । त्यासी सर्वार्थी दिसे शाती । शातीवेगळी उपपत्ती । प्रमाण निश्चिती रिधेना ॥ २५ ॥ शांति तेचि समाधान । शाति तेचि ब्रह्मज्ञान । शाति १प्रेरणा २ सापडत नाहीत ३ शाति, लोप ४ अहिंसा, सत्य, वगैरे यम अविश्रम (निल) पाळाचे, व बाह्यनेम (नियम) ईश्वरनिष्ठेला विरोध न येईल अशा रीतीने पाळावे ५ नाविक, कर्णधार, त्यावाचून ६ ओलीचिंय ७ कणगी, धान्य साठविण्याची मोठी बुरही टोपली ८ फोल, व्यर्थ ९ त्या रमासाठी १० सद्गुरूचे ठिकाणी श्रद्धा ठेऊन त्या सद्गुरूपडून सर करून झणजे अनुभव घेऊन ११ माहुली, मूर्ती १२ लार्साग देह १३ सहज, जाता जाता, मोठी पुण्याई पाहिजे असं नाही १४ बाट १५ लटका पहतो, दुर्घळ ठरतो १६ भनागनत परमहा १७ अमुक खूण अखें सागता येत नाही १८ युत्तिा . .