या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ एकनाथी भागवत गुरुचरणी निश्चळ चांग । अंगी वाजतां लगवंग । वृत्ति अभंग गुरुचरणीं ॥ १५ ॥ शरीर यर्ततां व्यापारां । ज्याचे हृदयीं नाहीं त्वरा । गुरुचरणीं धरिला थारा । हा शिष्यु खरा परमार्थी ॥ ९६ ॥ ज्यासी हदयीं चंचळता । तो शिष्य नव्हे. निजस्वार्था । ज्याचे अंतरी निश्चळता । तोचि परमार्था साधकू ।। ९७ ॥ ऐसी साधूनि निश्चळता । ज्यासी निजस्वार्थी जिज्ञासुता । तोचि क्षणार्ध परमार्था । पावे तत्त्वतां गुरुवाक्ये ॥ ९८ ॥ जैसा दीदी लाचिला । लावितांचि तत्समान झाला । तैसा निश्चयेंसी गुरु भेटला । तो तत्काळ झाला तद्रुप ॥ ९९ ॥ एवं अतरी जे निश्चळपण । तें शिष्याचे श्रेष्ठ लक्षण । तो सहावा गा गुण जाण । तेणे निर्दळण पडिकारां ॥ २०० ॥ पद्धिकार देहावरी । शिष्यु देहबुद्धी हाती न धरी । यालागी मावळिजे विकारी । गुरुवाक्ये करीं वर्ततां ॥१॥ ऐसी साध्य करूनि निश्चळता । साधू रिघे जो परमार्था । धरोनियां अर्थजिज्ञासुता । होये भजता गुरुचरणी ।। २ ।। ज्यासी अर्थजिज्ञासा नाही । तो भजेना गुरूच्या ठायीं | जरी भजेल कंहीवहीं। तरी स्वार्थ पाही विषयाच्या ॥३॥ सांडोनियां विपयस्वार्थी । इत्थंभूत जाणावया अर्था । जो भजे परमार्था । "जिज्ञासुता' त्या नांव ॥४॥ऐसी धरोनि जिज्ञासुता । चढती आवडी परमार्था । आराणुक नाही चित्ता । निजस्वार्थाचेनि लोभे ॥५॥ अतिप्रीती परमार्या । चढती वाढती आस्था । हे सातवी लक्षणता । जाण तत्त्वतां शिष्याची ॥६॥ हे सातवी लक्षणा । परमार्थाचे अगवणा । पावली असे जाणा । जिज्ञासुपणाचेनि नेटें ॥ ७॥ गुरु बहुतांची साउली । शिष्यवर्गाची माउली । तेथ असूया जेणे केली त्याची चुडाली निज. प्राप्ती ॥८॥यालागी जो जो गुरूचा अंकितु । तो तो गुरुत्वेंचि मानितु । असूया नाठवे मनांतु । अतिविनीतु सर्वासी ॥९॥ गुरुबंधु कनिष्ठ दीन । त्याच्या ठायीं उत्तम गुण । जाणोनि न मनी आपण । असदारोपण तेथें करी ॥२१०॥ पुढिलाचा उत्तम गुण । त्यासी मिथ्या लावूनि दूषण । लटिकें ह्मणे त्याचे ज्ञान । 'असूया' जाण त्या नांव ॥११॥ प्रत्यक्ष भेटल्या वर्णी गुण । नन होवोनि बंदी चरण । सवेचि मागें करी छळण ! असूया' सपूर्ण या नाव ॥ १२ ॥ सच्छिप्यु ये अर्थी निर्मळ । हों नेदी असूयेचा विटाळ । उत्तममध्यमप्राकृतमेळ । वंदी परी छळ करूं नेणे ॥ १३ ॥ गुरूने शिकविली वस्तुसमता । तेथ निरतर ठेवूनि चित्ता । समभाव वंदी समस्ता । छळू सर्वथा तो नेणे ॥ १४ ॥ यापरी गा उद्धवा । छळू नेणे कोणा जीवा । हा अनसूयु ह्मणावा । गुण आठवा शिष्याचा ॥१५॥ हे अष्टौमहामणिमाळी । अखंड ज्याच्या हृदयकमळी । तो पावे सद्गुरूजवळी । नेवी नन्हाळी भेटीची ॥१६॥ यावरी नववे लक्षण । ते जाण नवविधान । सत्यधूत सभापण । वाग्विलापन सांडूनी ॥ १७॥ सद्गुरूपति जाण । मृदु विनीत करी प्रश्न । सत्याचे सत्य ते गुरुवचन । मानी जाण निजभावें ॥ १८॥ युक्ति वाढवून उदंड । नाना मतें अकाड १ विक्षेप करणारे-शाति ढळविणारे प्रसग अगावर कोसळले असता २ आणण्याची इच्छा ३ निश्चळ. ४ देहामुळे ५ देह मी आह अशा बुद्धीला स्पर्श करीत नाही देहबुद्धि सोइन आत्मवृद्धि करतो ६ उप्त व्हाव ५ अथ जाणायाचा इच्छा. ८ कधीतरी. ९ पूर्ण १. समाधान, सतीष ११ अगवण झणजे सामथ्र्य १३ मत्सर १३ दास, एकनिष्ठ भफ १४ मानीत नाही भोळखीत नाही १५ सोटाभारोप १६ उत्तम, मध्यम व प्राकृत याच्या समुदायाला १७ परवावस्तू समत्व, वस्तु सर्वन ओतप्रोत भरल्यामुळे द्वितीयत्व नाही ही भावना १८ आठ महामण्याची माळ १९ नवानपण २० खरें व पविन २१ बडबड २२ यादविवादाचे प्रकार २३ पुष्कल, २४ भारडाभोरड.