या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ एकनाथी भागवत. आचरण । तेही लक्षण परियेसी ।। ६३ ।। वेद उल्लंघने कुमती । कुश्चित जनांचे सगती । अप्रवृत्तीची प्रवृत्ति । अधर्मस्थिती अवधारी ॥ ६४ ॥ यद्यधर्मरत सहादमता वाऽजितेन्द्रिय । कामात्मा कृपणो लुब्ध स्रणो भूतनिहिंसकः ॥ २७ ॥ सहज प्राणी कामासक्त । प्राप्तकामे अतिलुब्ध होत । काम न पवतां दीनचित्त । स्वभावो नित्य जीवांचा ॥६५॥ ऐशिया स्वभावनिष्ठासी । जरी संग होय असतु पुरुपेंसीं । तरी रति वाढे अधर्मासी । अकर्मासी प्रवर्ते ॥ ६६ ॥ चंचलत्वे मर्कट मन । त्यासी असत्सगर्मदिरापान । कामवृश्चिके देशिले जाण । तेव्हां वर्तन यद्वातदा ।। ६७ ॥ पिशाहाते धेडेवाळी । दीधल्या तो सर्वत्र जाळी । तेवीं असत्संगें करी होळी । स्वधर्म समूळी जाळिती ॥ ६८ ॥ चाळकाहाती दीधले शस्त्र । खोंचितां न ह्मणे आप पर । छेदी आपुलेचि शरीर । हितविचार ते नेणे ।। ६९ ॥ जेवीं जैनी अवतरे देव्हारा । तिच्या तोंडा नाही वोवारा । कां बहुरूपयाच्या दिगंरा । नाहीं थारा वैराग्या ॥ ५७० ॥ तैसा असत्सगें सरा । घाली दंभाचा पसारा । नाही विवेकाचा थारा । कामशास्त्रा प्रवर्ते ॥ ७१ ।। कामशालें अतिसकाम । कामास्तव जी अधर्म । अधर्मास्तव अकर्म । निंद्य धर्म आचरे ॥७२॥ निद्य कर्माचा सयोग । यासी मुंद्दल लुब्धंभोग । लुब्धभोगामाजी चांग । अधर्म सांग सविस्तर ॥७३॥अधर्म वाढता उभारा । परद्रव्य आणि परदारा । याचिलागी शरीरा । उपार्यद्वारा कष्टवी ॥ ७४ ॥ अगनेलागी अतिदीन । स्त्रीध्याने होय स्त्रैण । स्त्री साधावया जाण । भूतहनन आरंभी ॥ ७५॥ पशूनविधिनालभ्य प्रेतभूतगणान्यजन् । नरकानवशो जन्तुर्गत्या यात्युत्त्रण तम ॥ २८॥ । • विधि ह्मणे तें न करावें । वेदु बोले ते नाइकावे । स्मृतिशास्त्र नावडे जीवे । कर्म करावे स्वेच्छा ॥ ७६ ॥ जारण मारण उच्चाटन । स्तंभन मोहन वशीकरण । असाध्य साधूनि अंजन । करी लोगवण स्त्रियांसी ।। ७७ ॥ लोण राई आणि विववे । मधुरसी कालवी आघवे । शावरी मत्राचेनि वैभवे । होम करूं धांवे तामस ॥ ७८ ॥ कर्म करावया अभिचार । मेप जंबूक वानर । सरड बेडूक मत्स्य मगर । गीध धार होमिती ॥७९॥ नग्न. भैरव वेताळ । झोटिंग पिशाच कंकाळ । मारको मेसको मैराळ । भूते प्रबळ उपासी ॥ ५८० ॥ काळी चिडी टोकण घारी । काग बक उलूक मारी । आतूनि काळी मांजरी। शावरमंत्री होमिती ॥ ८१॥ वाहत्या पाण्याचें तेल चोरी । प्रदोपसी न्हाये शनिवारी । शाकिनी डाकिनी मध्यरात्री । होमामाझारी चेतवी ॥८२ ॥ मद्याचे घट पूर्ण भरी । मातंगीची पूजा करी । रुधिर घाली प्रेतपात्री । मोहनीमंत्री मंत्रूनी ।। ८३ ॥ घेती हळदीची उटी । सेदूर लाविती ललाटीं । काम साधावया हटीं । अजन कष्टी साधिती ॥ ८४॥ होमपान करावया तांतडी । समूळ अश्वत्थात तोडी । फलित पुष्पित ओपधी उपडी । आसनाबुडी घालावया ॥ ८५ ॥ वीज जपावया मंत्राचें । वोले कातडे प्रेताचें। १दुष्ट, पापी २ वाईटमागाची ३ इच्छित वस्तु मिळाल्याने ४ वाईट परपावरोवर. ५कर्मठ. ६ दुष्टसग हेच मद्यपान ७ मदनरूपी विंचवाने ८ पिमा-पिशाच, वेडा ९ कोलीत १. जाण ११ देव अगात येतो ह्मणून दम माजविणारी १२ आळा, मर्यादा १३ गोसाव्याचे सोंग घेणा-या बहुरूपयाचे ठिकाणी १४ दिगतरा १५ मूळ कारण १६ भोगाची आसताता १७ उत्पान क्षेऊन चादला भराता १८ साधन मिळविण्याच्या मार्गा" १९पाठलाग, प्राप्तियधन २० ही विधा अद्याप चगाल्याकडे आहे असें ह्मणतात २१ जारणमारणादि कर्भ २२ समामामे पाचारून २३ मागिणीची. २४ रक्क