या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहाचा, २४९आणवी मृगअस्वलांचे । भय पापाचें मानीना ।। ८६ ॥ खेचर भूचर जळचर । जीव पीडिती अपार । घेऊनि ब्राह्मणाचें रुधिर । अभिचार आचरती ॥ ८७ ॥ गायीबाह्मणांसी जाण । पीडा करिती दारुण । क्षेत्रवित्तदाराहरण । स्वार्थ प्राण घेताती ।। ८८॥ देवालयींचें देवंशेप । कां शिवालयींचे शिवशेप । घेता न करिती आळस । वासना असोस अधर्मी ॥ ८९ ।। एवं कर्म करिता ऐसे । तेणे अकर्म कर्मवशे । अधतमी तो प्रवेगे। जेवी का अवसे चद्रमा ।। ५९० ॥ अकर्म जाण अंतुर्वकी । जीवाचें निजज्ञान छळी । अतिमूढ करूनि ते काळी । निरयकल्लोळी घालित ॥ ९१ ।। ते नरकींची नवलकथा । कोटि वर्षे तळी जाता । ठाव न लगे गा मर्वथा । केवीं वरुता येईल ॥ ९२ ।। त्याते अधतम ह्मणती । जे देखता अध होय वृत्ती । निघता निर्ग, विसरती । नरकी वसती मूढत्वे ।।९।।जव होय कर्मभोगांत । तंव नरक भोगी आकल्पात । मग स्थावरत्व पावत । वृक्ष होत का पापाण ॥९४॥ ऐसी अवस्था गाढमूढ । केवळ जाड्य जाले जड । स्वमी सुख नेणती गोड । दुःख दुर्वा भोगिती ॥ ९५ ॥ एवं अधर्मवृत्ती वर्तता । सुखलेशन लभे सर्वथा । दुःख अनिवार भोगितां । निर्गमता त्या नाही ।। ९६ ॥ कर्माणि दु सोदकाणि कुर्वन्देहेन तै पुन । देहमाभजते तन कि सुख मयधर्मिण ॥२९॥ ऐकें बापा उद्धवा । मरणधर्मात्मका जीवा । सुस न भेटे त्याच्या भावा । दुःखमभवा. माजी वासू ॥ ९७ ॥ नरदेहा येगोनि केवळ । क्रूर कम करिती प्रबळ । ज्यांसी उत्तरोत्तर दु.खफळ । यातना सकळ भोगवी ॥ ९८ ॥ मरमरी दु'स भोगी दारुण । उपजोनि कम करी हीन । दुःसावती पडे जाण । आपणिया आपण घातक ॥ ९९ ॥ जे सतचरणी विमुख । त्यासी स्वभीहि नाही सुख । क्रूर कम करी कामुको चढतें दुःख सकामा ॥६००॥ एव प्रवृत्तीमाजी असता । सकाम कर्म आचरता । सविधि अविधि कम करिता । दुःख सर्वथा अनिवार ॥ १ ॥ सविधि काम्ये स्वर्गपतन । अविधि कान्ये नरक दारुण । एवं प्रवृत्तीमाजी जाण । सुख कोण सकामा ॥ २॥ हाणशी लोकपाळाच्या ठायीं । नित्य सुख असेल पाही । त्यासी जन्ममरण नाही । अमरत्व आह्मींही साधावे ॥३॥ लोकपाळाचे नित्य लोक । लोकपाळही नित्य देख । तेथे असेल नित्य सुख । ऐसे मूर्ख कल्पिती ॥४॥ रोकाना होपालाना मद्य करपजीविनाम् । ब्रह्मणोऽपि भय मतो द्विपरार्धपरायुष ॥३०॥ लोकपाळामाजी अमरेंद्र । मरुगणाचा राजा इंद्र । ज्यासी मानिती सूर्यचंद्र । वरुण कुवेर यमादि ॥५॥ ज्या अमरावती सिहासन । ऐरावताचें आरोहण । उच्चैःश्रवा अन्ध जाण । पुढे आपण खोलॅणिये ॥ ६ ॥ ज्यासी उर्वशी भोगपली । रभामुख्य विलासिनी । जेय तिलोत्तमा नाचणी । चितामणी लोळती ।। ७ ।। अष्टमासिद्धीची भाडारें । रलजडित धवळारें । मर्गजाचे डोल्हरे । सुवर्णसूत्रे लाविले ॥ ८ ॥ वैदूर्याचे शहाडे । काम १ आशशात, पृथ्वीवर व सात सचार करणारे प्राणी जारणमारण ३ देवलेश ४ जचाट ५ नरकात ६ अमावास्येला ७ बलाढ्य ८ नरकाच्या भयर गटात ९ बाहेर येणे १० कर्मभोगाचा अत ११ मोठ १२ मुदका १३ मृत्यूच्या स्वाधीन असणाऱ्या १४ स्थितीला १५ हु साध्या भोवन्यात १६ चढे १७ दिपार है आट दिशांचे खागी आठ आहेत इद्र, अमि, यम, नीति, यक्ष्ण, वायु, कुनेर आणि इशान १८ कोतवाउपोटे हा शब्द हानेभरीत याच प्रसगान आला आहे "लोकपाळ रागेचे । राउत जिये पदवीचे । च श्रवा गांचे । खोरीय ॥"शोधरी अध्याय ९-३२६, सेळती १९ लायना २० अणिमा महिमाआदि आटही सिद्धीची, भादवी मिदिबग्निता' ही होय २१ पवालये मणजे चुनेगधी वाडे २२ पाचेचे २३ मोगले वृक्ष ए भा ३२