या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० एकनाथी भागवत. धेनूंचे वाडे । कल्पद्रुमांचे मांदोडे । चहूंकडे शोभती ॥ ९॥ लोकपाळ आज्ञेचे । सुरसेना सैन्य ज्याचें । एवढें ऐश्वर्य जयाचे । राज्य स्वर्गीचे भोगित ॥ ६१० ॥ त्यासी माझी काळशक्ती । ब्रह्मयाचे दिनाती । चौदा इंद्र क्षया जाती । येरांची गती कायशी ॥ ११॥ ब्रह्मायु ह्मणती समता । जो द्विपरार्धआयुष्यवंता । जब न पवे माझी काळसत्ता । तव लाध्यता आयुष्याची ॥१२॥ज्यासी अग्रपूजेची मान्यता । जो लोकलोकपाळांचा कर्ता । त्या ब्रह्मयासी माझी काळसत्ता । ग्रासी सर्वथा सलोके ॥ १३ ॥ मी काळात्मा दंडधरू । शास्ता नियंता ईश्वरू । अतर्यामी सर्वेश्वरू । अतिदुर्धरू व्यापकू ॥ १४ ॥ माझा काळक्षोभ दारुण । त्यातें आवरूं शके कोण । धर्मअर्थकामें जाण । निवारण त्या नव्हे ॥१५॥ प्रळयका महाकाळासी । माझी कीर्ति ग्रासी । माझं महाभय सर्वासी । लोकपाळासी सुख कैचें ॥ १६ ॥ लव निमेष पळापळें । माझेनि भये सूर्य चळे । माझेनि भये प्राण खेळे । वायू चळे माझेनि भेणे ॥ १७॥ माझे आजेवरी अग्नि जाण । वेसवीतसे जठरस्थान । मद्भय नव्हे अधिक न्यून । पचवी अन्न चतुर्विध ॥ १८॥ यथाकाळी पर्जन्यधारी । इंद्र वर्षे मद्धयेकरी । मत्य स्वकाळे मळय करी। भय भारी त्या माझ॥१९॥ माहोनि भयेंकरी देखा । समुद्र नोलांडी निजरेखा । माझिया भयाची थोर शंका । तिही लोकां कांपवी ॥ ६२० ॥ तिही लोकांचा भास्ता । ईश्वर तो भी नियंता । तेणे कम जडाची वार्ता । अनीश्वरता छेदिली ॥ २१ ॥ प्रवृत्तीसी अनर्थता । मागां दाविली तत्वतां । वैराग्य स्थापिले सदृढता । निवृत्ति सर्वथा अतिश्रेष्ठ ॥ २२॥ आपुल्या ऐश्वर्याच्या आविप्कारें । साधूनि ईश्वरत्व केले खरें । मीमांसकमतनिराकारें । निरूपण पुढारें चालवी ॥ २३ ॥ मीमांसकमतवार्ता । बोलिले जीवासी अनेकता । तोचि कर्ता आणि भोक्ता । हेचि सर्वथा निराकारी ॥ २४ ॥ गुणा सृजन्ति कर्माणि गुणोऽनुसृजते गुणान् । जीवन्तु गुणसयुक्तो भुक्के कर्मफलान्यसौ ॥३१॥ । ' कृपण ह्मणे उद्धवातें । एकादश इंद्रिये समस्ते । करिती नानाविध कर्मातें । आत्मा तो येथे सर्वसाक्षी ॥ २५ ॥ दीपु उजळलिया घरी । लोक वर्तती व्यापारी । तो "नेमी ना निवारी । तैशापरी जीचू येथें ।। २६ ॥ जीबू प्रेरोनि इंद्रियातें । ह्मणाल करवितसे कर्मातें। जेवीं कु-हाडी घेऊनि हातें । छेदी वृक्षातें कृपीवळू ॥ २७ ॥ ऐशी इंद्रियाची प्रेरकता। जीवासी न घडे सर्वथा । ते न घडावयाची ऐक कथा । तुज तत्त्वता सांगेन ॥२८॥ इंद्रियां कर्मी प्रेरण । करिते सत्वादिक गुण । जीबू उभयसाक्षी जाण । कर्मकारण त्या नाही ॥ २९ ॥ अगें नातळतां आपण । चुंबक सनिधिमात्र कारण । अचेतन लोहाँ करी चळण । तैसा जाण जीव येथे ॥ ६३०॥ कां उगवल्या दिवाकर । सुष्ट्रदुष्ट्र लोकव्यापार । तो सूर्यासी नातळे कर्मभार । साक्षी साचार कर्माचा ॥ ३१॥ तैसी जीवासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा । दिसे जे काही आपातता । ते आध्यासिकता मिथ्यात्वें ॥३२॥ १ गोवळ, गोठे २ जुवाडे "तरी ऊध्वाही बडे । शाखा मादोरेशानेश्वरी १५-६० ३ आज्ञाधारक ४ ब्रह्म देवाच्या ५ ब्रह्मदेवाचे आयुष्य ६ समस्ता ७ दोन पराध वर्षाच आयुष्य असलेल्यास ८ ब्रह्मलोकासह ९ राहवितो १० चार प्रसारचे आआहे, "शुष्क अथवा स्निग्धे । सुपक का विदग्धे । एव मीचि गा चतुर्विधं । अग्ने पर्ची "-ज्ञानेश्वरी १५-४१९ पोरडे, निग्ध, शिजरे किया बच्चे ११ वेळा, मर्यादा १२ अनिवारता १३ सचाराने किया प्रवेशान १४प्रकाशित केल्यावर १५तूह कामकर ह्मणून नेमणे १६न स्पर्शता १७रोखहास १८ प्रेक्षक १९राहमगसा. २० भ्राति