या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ एकनाथी भागवत. वार्ता | संबंधू तत्त्वतां मज नाहीं ॥ ३० ॥ माझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । बद्धमुक्कर दोनी नाहीं । बद्धता मुक्तता गुणांच्या ठायीं । आमासे पाही गुणकार्ये ॥ ३१ ॥ गुण समूळ मायिक । मी गुणातीत अमायिक । सत्यासी बाधे लदिक । तैं मृगजळी लो बुडाले ॥३२॥ चित्रींचेनि हुताशनें । जै जाळिजती पुरे पट्टणे । कां स्वमीचेनि महाधनें वेव्हारा होणे जागृतीं ॥ ३३ ॥ सूर्यासी प्रतिविंव गिळी । छाया पुरुपातें आकळी । समु बुडे मृगजळी । तैं मज गुणमेळी वद्धता ॥ ३४ ॥ 6 जिभेसी केंसु निघे । अँ तळहार वृक्षु लागे । डोळयांमाजी पर्वत रिगे । ते मी गुणसंगें अतिवद्धू ॥ ३५ ॥ आकाश खाँ सावेळी । काजळ लागे वारया निडळी । कां विजूचे कपाळी । वाशिंग सकळी वांधा ॥ ३६॥ गगन तुटोनि समुद्री बुडे । सपर्वत धरा वारेनि उडे । सूर्य अडखळोनि अंधार पडे । तरी मी सापडें गुणांत ।। ३७ ।। अतरिक्षगगनी सरोवर । त्यामाजी कमळे मनोहर तो आमोद सेविती भ्रमर । ऐसें साचार 6 घडे ॥ ३८ ॥ ते मी आत्मा गुणसंगें । नाना विषयभोगसंभोगें । मग त्या विषयांचेनि पांगें । होईन अगं गुणवळू ॥ ३९ ॥ त्रिगुण अगी कारें वर्ततां । गुणकार्य तदात्मता । तेणे बद्ध मुक्त अवस्था । भासे वृथा भ्रांतासी ॥४॥ गुणा आत्म्यासी भिन्नता । ह्मणसी मानिली तत्त्वता । परी गुणसगे आत्मा असता । अवर विकारिता येईल ॥४१॥ अग्निसगें पान तप्त । पानसगे जळसतप्त । जळता धान्यपाव होत । तेवी विकारवत नव्हे आत्मा ॥ ४२ ॥ अग्नितापाआत । आकाश नव्हे संतप्त तेवी गुणसंगा आंत । विकारवंत नव्हे आत्मा ॥ ४३ ॥ नट अधत्वे अवगला । परी तो आंधळा नाही जाला । तैसा आत्मा गुणसगें क्रीडला । तरी असे सचला निर्गुणत्वे ॥४४॥ नटु अंधत्वें नव्हे अंधू । आत्मा गुणसंगे-नव्हे बद्ध । गुण मायिक आत्मा शुद्धू । या त्या सवंधू असेना ॥४५॥ आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न । याही हेतू न घडे बंधन । सकळ समुद्राचे प्राशन । केवीं रांजण करू शके ॥४६॥ मोहरीमाजी मेरु राहे । पशामाजी पृथ्वी सँमाये । मुंगी गज गिळोनि जाये । खद्योत खाये सूर्यातें ॥४७॥ मशकु ब्रह्मांडातें आकळी । पतंगु प्रळयानळ गिळी । तरी आत्मा गुणाचे मेळी । गुणकल्लोळी बांधवे ॥४॥ यापरी न सभवे बद्धता । वद्धतेसवे गेली मुक्तता । बद्धमुक्तअवस्थांपरता । जाण तत्त्वतां 'आत्मा मी ॥ ४९ ॥ स्वमींचा अत्यंत सुकृती । अथवा महापापी दुष्कृती। दोन्ही मिथ्या जेवी जागृता । तेवीं बद्धमुक्ती आत्मवीं ॥ ५० ॥ हो कां जीवात्म्यासी वद्धता । सत्य नाहीं गा तत्त्वता । मा मज परमात्म्यासी अवस्था । बद्धमुक्तता ते कैची ॥५१॥ विवी प्रतिविच नाहीं । मध्ये आरिशाचे ठायी । मळ वैसले ते पाही । प्रतिर्विवाचे देही लागले दिसती ॥५२॥ तो मळू ज पंडे फेडावा । तै आरिसाचि साहणे सोडावा । परी प्रतिविव त्या साहणे धरावा । हें सद्भावा मिळेना ॥ ५३॥ जेवीं जीवशिवभेद नाही । दोष अंत:करणाच्या ठायीं । तें चित्त शुद्ध केल्या पाहींबंध मोक्ष दोहीं वोळवण ॥५४॥ तैसें आवि. १मी २ व्यवहाराला ३ मावली ४ शिरे ५ राया किंवा सानमा झणजे वी, पदार. "कौतुके में में जरपे । ते सवलाहूनि तीस स्पे"-ज्ञानेश्वरी अध्याय १३-६३ ६ कपाळावर ७ पर्वतारह पृथ्वी जर पान्या उद्देल ८ पराधीनपणाने ९ दिसला १० मर्यादित ११ डेरा १२ मोहरी-सहान दाणा १३ पमा-गांजळ १४ सामावते १५ एगे. १६ सहाणेवर घोसा १७ नाहीसे होणे, निरास १८ अशाना, अवियेने उभारलेले