या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा २६१ बंधन छेदी । या दोनी माझ्या अवस्थाशक्ति अनादी । जाण निशुद्धी उद्धया ॥ १० ॥ तूं चिन्मान चैतन्यधन । चित्स्वरूपें वृत्तिशून्य । तुज शक्ती कैच्या जाण । निर्धर्मकपणे सर्वदा ॥१॥ उद्धवा हे आशंका वाया। कारण नाहीं करावया। या शक्ती जन्मवी माझी माया । जे न ये आया सुरनरा ॥२॥ सत् ह्मणों तरी तत्काळ नासे । असत् ह्मणों तरी आभासे । जिणे नामरूपाचें पिसे लाविल असे जगासी ॥३॥ नातडे सतासतबोली। माया अनिर्वचनीय जाली । तिणे विद्या अविद्या इय पिली । वाढविली निजपक्षी ॥४॥ आजिकाळी केल्या नव्हती । विद्या अविद्या अनादिशक्ती । बंधमोक्षाते भासविती । या दोनी शक्ति मायेच्या ।। ५ ॥ ते माया तू ह्मणसी कोण । तुझी कल्पना ते माया पूर्ण । बडमुक्ततास्फुरण । तीमाजी जाण स्फुरताती ।। ६ ।। बधमोक्षाची राहती स्थिती । ते मी सागेन सुजमती । ऐक उद्धवा निश्चिती । यथानिगुती निवाडें ॥७॥ स्वमीं न देखे आराधन । ज्यासी नाही माझें भजन । अविद्या त्यामाजीं सपूर्ण । प्रवळ जाण वाढत ॥ ८ ॥ जो माझ्या ठायीं अतिसादर । भजनशीळ आठौ प्रहर । तें ब्रह्मविद्येचे घर । तेथ निरतर ते वाढे ॥ ९॥ जेथ माझा भजनाचा उल्हासू । तेथ अविद्येचा निरासू । तोचि ब्रह्मविद्येचा प्रवेशू । हा अतिविश्वासू भक्तांचा ॥११०॥ येथ वद्धाचे कारण । आणि मोक्षाचे साधन । भक्तीचे दृढ स्थापन । अर्थास्तव जाण बोलिलो ॥ ११ ॥ ज्या बंधमोक्षां टोनी वृत्ती । त्या तूं मायेच्या ह्मणसी शक्ती । तेव्हा माया जाली मोक्षदाती । हे केनी श्रीपति घडेल ॥ १२॥ जरी माया जाली मोक्षदाती । तरी का करावी तुझी भक्ती । हेचि सत्य गा श्रीपती । साग निश्चिती निवाडू ।। १३ ।। कृष्ण ह्मणे उद्धयासी । स्वयें चलन नाही छायेसी । तेवी सामर्थ्य नाही मायेसी । केवी मोक्षासी ते देईल ॥ १४ ॥ जो मायेचा नियंता । तो विष्णु मोक्षाचा दाता । तोडूनि जीवाची वद्धता । सायुज्यता देतसे ॥ १५॥ हाणशी अविद्या कामकर्मादृष्टें । जीयासी बधन लागे मोटे । तें ब्रह्मविद्या निष्कम तुटे । हा चोध करी नेटे गुरु श्रुतिद्वारा ॥ १६ ॥ येथ विष्णु काय जाला कर्ता । मा तो होईल मोक्षदाता । हे विकल्पाची वार्ता । न घडे सर्वथा उद्धवा ।। १७ ॥ गुरुरूप विष्णु जाण । श्रुत्यर्थ विष्णूचि आपण । शमदमादि साधन । तेही जाण विष्णूचि ॥ १८ ॥ शिष्यवुद्धीसी बोधकता । विष्णुचि जाण तत्त्वतां । यापरी गा निजभक्तां। मोक्षदाता श्रीकृष्ण ॥१९॥ त्या मोक्षाचा जो परिपाकाते समाधी श्रीविष्णूचि देख । समाधीच समाधिसुख । आवश्यक श्रीविष्णू ॥ १२० ॥ परमात्मा परिपूर्ण । तो मी विष्णु ब्रह्मा सनातन । भक्तभवपाशमोचन ।कृपाळू जाण करीतसे ॥२१॥ गत श्लोकींचेनि अनुवादें । शरीरिणाम्' येणे पर्दे । जीवासी बद्धपण उद्वोधे । तेही 'विनोदें निवारितों ।। २२।। एकासीच बद्धमुक्तता घडे न घडे तत्त्वता । या उद्भवाच्या प्रश्नार्थी । विशेद आतां करीतसे ॥२३॥ १ थधात पालणारी ती अविद्या व मोक्ष देणारी ती विद्या या दोन्ही माझ्या पुरातन शक्ति आहेत २ निश्चित, सरोसर ३ आटोक्यात ४ सापडत नाही. ५ मायेरा सतही हाणता येत नाही व असतही हाणवत नाहीं माया झणजे कल्पना व कल्पनाच वप व मोक्ष या दोन घृती भासविते ६ आजकाल, अलीकडे,नवीनच प्रवृत्ती ८ स्वरूप ९ अगदी पष्टपणे १० असार ११ हेतुसाठी १२ चालणे १३ कृष्ण १४ कमत्यागान १५ जाणीव १६ "वत्यद पर मध विष्णुरेव सनातन' अर्से सदपुराणात होटल आहे १५ बी परिपूर्णता १८ भवाचे ससारपारा तोदणारा ५९ होते २० सहज २१ स्पर 9s . . . ...