या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ एकनाथी भागवत जीयु इच्छी जें जें कांहीं । ते ते वासनेसरिसे पाहीं । ईश्वर पुरवी सर्वही । विमुख कांही हो नेणे ॥ ६७ ॥ अंतकाळी जे जीव मागे । तें अलोट ईश्वर देवों लागे। आणि ईश्वरआज्ञेचेनि योगें। जीव सर्वांगे वर्तत ॥ ६८ ॥ ईश्वरआज्ञा त्रिशुद्धी । जीवे जीव सर्वस्वे वंदी। होय नव्हे न ह्मणे कधी । अभिनव सिद्धी सखेपणाची ॥ ६९ ॥ नवल सख्यत्वाची परी । ईश्वरू जैसे जैसे प्रेरी । जीवू तैसे तैसे करी । निमेपभरी ढळेना ॥ १७० ॥ निमेप आरंभोनि जन्मवरी । जीवू ईश्वराची आज्ञा करी । ईश्वरू जीवाचा साहाकारी । परस्परी निजसख्ये ॥ ७१ ॥ जी अत्यंत अॅडलेपणे । ईश्वरासी धांव धांव ह्मणे । तो तत्काळ पावे धांवणे । करी सोडवणे जीवाचे ॥ ७२ ॥ एवं शिवाचे आज्ञे जीवू राहे । जीवपण गेलिया शिवी समाये । जीवालागी हा गिवपणा वाहे । येरवी राहे सांडूनी ॥ ७३ ॥ ऐसें सखेपण याचे । केवी अनुवादवे वाचे । उद्धवा हे मीचि जाणे साचे । या सखेपणाचे सौजन्य ।।७४ ॥ जीव ईश्वराआधीन । हे दृढ केले सस्थापन । अनीश्वरवादाचे खंडण । प्रसगे जाण दाविलें ॥७५॥ अनीश्वरवादू खंडितां । खंडिली कर्मपाखंडवार्ता । कर्मपाखंडाच्या मता। ईश्वरता न मानिती ॥७६ ॥ ह्मणती चित्तधर्म ईश्वरासी। तव चिद्रूपता स्थापूनि त्यासी । निराकारिले चित्तधर्मासी । अनायासी चिद्रूपें ॥ ७७ ॥ नानापरीचे अतिचिंतन । त्याचि नांव चित्त जाण । चित्तवीण निश्चळपण । तेंचि चैतन्य उद्धवा ॥ ७८ ॥ धर्माधर्म न विचारिता । ह्मणती ईश्वर मोक्षदाता। हे भक्तपाखंडी कथा। स्थापूनि चिद्रूपता निवारी ।। ७२ ॥ टिळे माळा मुद्रा धारणे । लावूनि सतांसी निंदिले जेणे । पाप रोहटे भक्तपणे । त्यासी नारायणे नुद्धरिजे ॥ १८० ॥ अतरीचे सर्व जाणता मी । यालागीं नांवे अतर्यामी । तो मी शान्दिकवचनधर्मी । चाळविला अधर्मी केवी जाये ॥ ८१ ॥ मी ज्ञानस्वरूप तत्त्वतां । सर्वद्रष्टा सर्वज्ञाता । तो मी धर्माधर्म न विचारिता । मोक्षदाता हैं न घडे ।। ८२ ॥ धरोनियां भक्तभावो। पाप राहाटे जो स्वयमेवो । याचि नामी दाभिक पहा हो । त्याते देवो नुद्धरी ॥ ८३ ॥ सदृशौ आणि सखायौ । धरोनि या पदाचा अन्वयो। पाखंडमानाते पहा हो । स्वयें देवो उच्छेदी ।। ८४ ॥ निरसोनि नाना मतांतरें । स्वमत करावया खरे । श्लोकींची पदें अतिगंभीरें । शार्ङ्गधरें वर्णिली ।। ८५ ॥ ते दोनी मिळोनिया पक्षी । नीड केले देहवृक्षीं । वृक्ष हाणिजे कोणे पक्षी । तीही लक्षी लक्षणे ॥ ८६ ॥ जननीउदर तेंचि ओळ । पित्याचे रेत वीज सकळ । गर्भाधान पेरणी केवळ । सकल्पजळ वृद्धीसी ।। ८७ ॥ सोहंभावाचा गुप्त अकुरू । त्रिगुणभूमी तिवना डिसें। कोहंभावे वाढला थोरू । वृक्ष साकारू तेणे जाला ॥८८ ॥ करचरणादि नाना शाखा । प्रवळवळ वाढल्या देखा । अधऊर्ध्व नखशिखा । वृक्षाचा निका विस्तारू ॥ ८९॥ तया देहबुद्धीची दृढ मूळे । विकल्पपारच्या तेणे मेळे । भूमी रुतल्या प्रवळवळे । कामाचे १ प्रतिमू, चिरुद्ध २ अतिशय, घेववणार नाही इतकें ३ जीव ईश्वराच्या भात राहतो व ईश्वर जीवाचे इच्छिलेले रावं पुरवितो त्यामुळे त्याच सत्य निरुपम आहे ४ टळेना ५ अडचणीत सापडल्यामुळे ६ एकरूपत्वान मिसळून जातो धारण करितो ८ बोलये ९ जाणविले १० चिंतन करणारे ते चित्त व जेधे चिंतन नाहीं त चतन्य ११ आचरतो १२ भलभलत्या शब्दानी भासविला ह्मणून १३ सारखे १४ मिन १५ शानांवाचे धनुष्य धारण करणारा विष्णु त्यानं १६ घरटे १७ देहरूप वृक्षावर १८ कोणत्या कारणास्तव, का ह्मणून १९ आळे २० वासना २१ निगुण भूमीमुळे सीन फोक सारे "मगसत्वरजतमात्मक निविध अहकार जो एक । तो तिवणाअधोमुस । डिर फुटे" (शा.१५-९५)