या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ एकनाथी भागवत ब्राह्मणपूजा । करूं जाणे अतिवोजा । पूज्यपूजकत्वें भावो दुजा । न मनूनि द्विजां पूजितु ॥५५॥ धनुपी काढू जाणे वंढी । अनुसधानें वाण सोडी। अलक्ष लक्षुनि भेदी निरवडीं। परी न धरी गोडी लांघेची ॥५६ ॥ कैसें कर्म निपंजे करी । जैगा समुद्रामाजी लहरी । तैसा निजस्वरूपामाझारी । नाना व्यापारी निश्चलु ॥ ५७ ॥ सूर्यु मृगजळाते भरी । तैसा व्यापारू निजनिर्विकारी । परी केलेपण शरीरी । तिलुभरी असेना ॥ ५८ ॥ सूर्यकांती अग्नि खवळे । तें कर्म ह्मणती सूर्ये केले । तैसे हस्तव्यापार जे जे जाले । नाही केले तें त्याणे ॥ ५९ ॥ सूर्यकाती पाडावा अग्नी । हें नाहीं सूर्याचे मनीं । तेवी मुक्त निरभिमानी। क्रियाकरणी विचरतु ।। ३६० ।। त्यासी चालऊं जातां पायें । तळी पृथ्वी नाही होये । आपण आपणियावरी पाहे । चालतु जाये स्वानंदें ॥ ६१ ॥ जळींचा जळावरी तरग । अभिन्नपणे चाले चाग । तैसा तो निजरूपी सांग । चालवी अग चिद्रूपें ॥ ६२ ॥ तयासी असतांही चरण । आवडी चाले चरणेविण । करी सर्वांगें गमन । सर्वत्र जाण जालासे ॥६३॥ जेची अखंड दडायमान । पायेंवीण चाले जीवन । तेवीं चरणेविण गमन । नित्य सावधान मुक्ताचे ॥६४॥ सर्वथा पायेंवीण । वायूचे सर्वत्र गमन । तैसेच मुक्ताचे लक्षण । स्वरूपी जाण सर्वत्र ॥ ६५ ॥ यापरी न हालता जाण । त्याचे सर्वत्र गमन । नाठवे चालतेपण । ऐसेच लक्षण मुक्ताचें ॥ ६६ ॥ मुळी आत्मा आत्मी नाही जाणा । यालागी खीपुरुपभावना । त्यासी सर्वथा आठवेना । देवे अंगना तो भोगी ॥ ६७॥ नटू नाटकु अवर्गला। पुरुप स्त्रीवेचे दिसो आला । स्त्रीपुरुपभावो सपादिला । तेवी हा जाहला गृहस्थु ॥ ६८ ॥ का अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुप तोचि नारी । मुक्तासी जाण तैशापरी । स्त्रीपुरुषाकारी निजबोधू ।। ६९ ॥ जेवी कां आपुली साउली । आवडी आपण आलिगिली । तेवीं मुक्त स्त्री भोगिली । द्वैताची भुली साडोनी ॥ ३७० ॥ छाया कोठे असे कोठे बसे । सरशी असता ज्याची तो न पुसे । मुक्तासी जाण तैसे । लालुप्य नसे स्त्रियेचें ॥ ७१॥ एवं स्त्रीपुरुपविकारप्राप्ती । त्याची न मोडे आत्मस्थिती । दैवे जाहलिया सतती आत्मंप्रतीति तेयेही ॥ ७२ ॥ 'आत्मा वै पुत्रनामासि' । सत्यत्व आले ये श्रुतीसी । पुनत्वे देखे आपणासी । निजरूसी सर्वदा ॥ ७३ ॥ स्वयें जनकू स्वयें जननी । स्वयें क्रीड़े पुत्रपणी । आपणावाचूनि जनींवनीं । आणिक कोणी देखेना ॥ ७४ ॥ एवं स्त्रीपुत्रसतती। जेवीं आकाशी मेघपंक्ती । काळे येती काळें जाती । तैशी स्थिति मुक्ताची ॥७५ ॥ स्त्रीसभोगी जे होय सुख । तें सुख मुक्तासी सदा देख । यालागी स्त्रीकामअभिलाख । नाही विशेख मुक्तासी ॥ ७६ ॥ जैसे राजहंसापाशीं शेण । तैसें मुक्तापाशी जाण धन । त्यावरी त्याचें नाहीं मन । उदासीन सर्वदा ॥ ७७ ॥ व्याघ्रासी वाढिले मिष्टान्न । ते त्यासी जैसे नावडे जाण । तैसें, मुक्कासी नावडे धन । धनलोभीपण त्या नाही ॥७८ ॥ पोतीस कापुराचा डळा । जेवी नातळे काउळा । तेवीं अनयरत्नउमाळा । मुक्तें साडिला थुकोनी ॥ ७९ ॥ ज्यासी धनलोभाची आस्था । त्यासी कल्पाती न घडे मुक्तता । तैसे स्त्रीकामिया १ यथास्थित, योग्यविधिपूर्वक २ कुशलतेने ३न्लाध्यतेची ४ उत्पन्न होते ५ निरंतर, एकसारखें ६ जापला ७ भिनपणाची कल्पना साइन ८ जवळ, सन्निध ९ आसक्ति १० भापलेपणा तेथेही आहे ११ विशेप,- खीमुख या बुद्धीनं अभिटाप नाही १२ पोतास झणजे शुद्ध कापूर "दिवी पोतासाची सुमटा"-ज्ञानेश्वरी अध्याय १०-१४२ १३ कापुराच्या ज्वाळा. १४ टकाढीग