या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा २८१ फोडी माथा । तेही सर्वधा असतीचि ॥ ६३ ॥ जे न विचारी पापपुण्य । कामाचारी धर्मशून्य । हे असतीचे लक्षण । उद्धचा जाण निश्चित ॥ ६४ ॥ असतीचिये सगतीं । कैची होईल सुखप्राप्ती । अतिदुःखें दु.खी होती । जाण निश्चिती ते नर ॥ १५ ॥ ज्याचें देह पराधीन । तो जीवे जिंता सदा दीन । पराधीना समाधान नव्हे जाण कल्पाती ।। ६६ ।। साडोनि आपली निजसत्ता । ज्यासी लागली पराधीनता । तो स्वमींही सुखाची वातों । न देखे सर्वथा निश्चित ।। ६७ ॥ पर हाणिजे माया जाण । जो झाला तिचे आधीन । त्यासी सुखाचें न दिसे स्वम । दुःख सपूर्ण सर्वदा ॥ ६८ ॥ पराधीनासी सुख । आहे ह्मणे तो केवळ मूर्ख । सोलीव दुखाचें दुःख । अवश्य देख पराधीना ॥ ६९ ॥ ऐक प्रजाचा विवेक । एक पुत्र एक लेक । एक ते केवळ मूर्ख । दुःखदायक पितरासी ॥५७०॥ जो नरकापासोनि तारी । जो पूर्वजाते उद्धरी । जो मातापित्याची भक्ति करी । अव्यभिचारी हरिरूपें ॥७१ ॥ जो साडोनिया मातापिता । जाऊ नेणे आणिके तीर्था । त्याचेनि चरणतीर्थे पवित्रता । मानिती सर्वथा अनिवार ।। ७२ ॥ जैशी रमा आणि नारायण । तैशी मातापिता मानी जाण । चढत्या आवडी करी भजन । नुवगे मन सेवेसी ॥७३ ।। जो अतिसत्वे सात्विकू । जो पितृवचनपाळकू । जेणे धर्माधर्मविवेकू । हा नैसनिक स्वभावो ॥ ७४ ॥ जो मातापित्याचे सेवेवरी । आपआपणियातें तारी । सकळ पूर्वजांतें उद्धरी । तो ससारी सुपुत्र ॥ ७५ ॥ ऐशिया पुत्रासी प्रतिपाळिता । सुख पावे मातापिता। पूर्वजातं उद्धरिता । स्वयें तरता पितृभक्ती ॥७६॥ जालिया सुपुत्रसतती । एवढी होय सुखप्राप्ती । आता असत्प्रजाची स्थिती । ऐक तुजप्रती सागेन ॥ ७७ ॥ मूळीचें पद 'असत्प्रज' । त्यांचे वर्तणुकेची चोज सागता अत्यंत निर्लज्ज । तेही मी तुज सागेन ॥७॥ पोटी उपजले जे लेक । त्याची वर्तणूक ऐशी देख । आवडे कांता आणि कनक । उपेक्षिती निम्शेस मातापिता ॥७९॥ जे कुडे कुचर कुलट । जे का अत्यंत शठ नष्ट । जे अनाचारी कर्मभ्रष्ट । अतिदुष्ट दुर्जन ।। ५८० ।। त्यासी भाडवल लॅटिक । लटकी द्यावी आणभाक। माता पिता ठकावी देख । सात्विक लोक नाडावे ॥ ८१॥ आपण नरका जावे ते जाती। परी पूर्वज नेले अधोगती । ऐशिया प्रजाते प्रतिपाळिती। ते दुसी होती अतिदुखें ।। ८२॥ पोटामाजी उठिला फोडू । त्यासी करिता न ये फाडू । तैसा असत्मजी ससार कडू। दुःख दुवाडू भोगवी ॥८३ ॥ ऐशिया पुत्राचे जितां दुस । मेल्यापाठी देती नरक । असत्प्रजाचे करतिक । दुःखें दुख अनिवार ॥ ८४ ॥ गाठी असोनियां धन । जो सत्पात्री न करी दान । तें सर्व दुखाचे मूळ जाण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८५॥ धन अर्जावया अनेक सपाय अपाय करिती लोक । नाना क्लेश भोगोनि दु.ख द्रव्य देख साचिलें ॥८६॥ प्रथम दुःख द्रव्य साचितां । दुसरें दुःख द्रव्य रक्षिता । स्त्रीपुत्र प्रवर्ते घाता। इतर कथा ते भिन्न ॥ ८७॥ सत्पात्री न करितां दान । जेणे रक्षिले यक्षंधन । तेथे दुखचाहुल्ये उठी विघ्न । धर्मरक्षण तेच नाहीं ॥ ८८ ॥ ऐसेंही धन गेलियापाठी । अतिदुखें । १ डोके फोडून घेई २ जिवतपणी ३सरं ४ पित्यासी ५ एकनिष्ठपणाची ६ वाला प्रेमानं ५ फटाळताही जमसिद्ध ९ दुष्ट सततीची १.रीत ११ लयाची किंवा स्थानी हेच ज्याच माडवल १० शपथ १३ कठिण, असह्य १४ पदरी १५ मिळवण्यासाठी १६ चोऱ्या, वाचा १७ कुबेराची संपत्ती 'यक्षवित पतत्या. बहुदराने .. ..