या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • अध्याय अकरावा.

२८९ विरुद्धता । आता दुष्टकामी जो विचरता। मी भजतसे भगवंता । दोष सर्वथा भज न लगे ॥५६॥ ऐसऐसिया भावना । जो दुष्ट कामी विचरे जाणा । हे भजनी विरुद्धलक्षणा । भक्ता अभक्तपणा आणित ।। ५७ ॥ मज नार्पिता जे जे श्राद्ध । ते त्याची कल्पना विरुद्ध । श्राद्धसकल्प अविरुद्ध । मदर्पणे वेद गर्जती ॥ ५८ ॥ श्राद्धी मुख्य सकल्प जाण । पितरस्वरूपी जनार्दन । ऐसे असोनिया जाण । नैवेद्य मदर्पण न करिती ॥ ५९ ॥ अन्न ब्रह्म अहं ब्रह्म । हे श्राडींचे गुह्य धर्म । ऐसे नेणोनि शुद्ध कर्म । वृथा श्रम वाढविती ॥ ७६० ॥ मी सकळ जगाचा जनिता । मुख्य पितराचाही मी पिता । त्या मज कर्म नार्पिता । निरुद्ध सर्वथा ते श्राद्ध ॥ ६१ ॥ मज नार्पिता जे जे करणे । तें तें उपजे अभतपणे । विरुद्ध धर्माची लक्षणे । दुख दारुणे अनिवार ॥ ६२ ॥ उत्तम भक्तांचे लक्षण । संकल्पवीण जाण । अन्नपानादि मदर्पण । करिती खूण जाणती ॥ ६३ ॥ ध्रुवाच्यापरी अढळ । जे माझ्या ठायीं भजनशीळ । ते माझी भक्ति अचचळ । अतिनिश्चळ पावती ॥६४ ॥ आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या तिघासी जी नव्हेचि प्राप्ती । ते माझी जे चौथी भक्ती । प्रेमें पावती उद्धवा ॥ ६५ ॥ आर्त आतिहरणकाजे । जिजासु जाणपणालागी भजे । तिजेनि वारिजे । अतिअर्थसिद्धी॥६६॥यावरी चौथियांचे ठायीं । या कल्पनाचा 'मागमोस नाहीं । यालागी चौथी भक्ति पाही । त्याच्या ठार्थी घर रिधे ॥ ६७ ॥ जया भक्तीमाजी वाकोडें । मीच मी चहूकडे । जेथींच्या तेथें सांपडे । हे भजन जोडे तयासी ॥६८॥ सकल्प केलियावीण । सहजे होतसे मदर्पण । हे चवथे भक्तीचे लक्षण । अतयंभजन पै माझें॥६९ ॥ तेथ जे करणे तेचि पूजा । जे बोलणे तो जपू माझा । जे देखणे ते अधोक्षजा । दर्शन वोजी होतसे ॥ ७७० ॥ तेथ चालणे ते यात्रा माझी । जे भक्षी ते मजचि यजी । त्याची निद्रा ते समाधि माझी । ऐसा मजमाजी भजतसे ॥ ७१॥ यापरी अनायासें जाण । सहजें होतसे मदर्पण । हे चौथी भक्ति सनातन । उद्धवा सपूर्ण तो लाभे ॥७२॥ उद्धवा ऐसे मानिसी चित्ती । जे मुळीहूनि चारी भक्ती । पहिली दुजी तिजी चौथी। मिथ्यावदंती कल्पना ॥ ७३ ।। सहज माझी जे प्रकाशस्थिती । ते भक्ति बोलिजे भागवती । सविती बोलिजे वेदाती। शैवी शकी चोलिजे ।। ७४ | चौद्ध जिनेश नेमिनाथ । जोगी ह्मणती आदिनाथ । भैरव खडेराव गाणपत्य । अव्यक्त ह्मणत एक पैं ॥ ७५ ॥ एक हाणती हे आदिमाता । सौर मणती तो हा सविता । असो नावाची बहु कथा । उपासकता विभाग ॥७६॥ ऐशी जे का प्रकाशस्थिती । त्या नाव बोलिजे भक्ती । जेणे प्रकाश त्रिजगतीं । उत्पत्ति स्थिती लय भासे ॥ ७७ ॥ माझ्या नाना अवतारमाळा । येणे प्रकाश प्रकाशती सोज्वळा । देवो देवी सकळा । ते प्रकाशमेळा भासती ॥ ७८ ॥ माझ्या अवताराची उत्पत्ती । तेणे प्रकाशे असे होती । नाना चरिने अती। प्रवेशती ते ५जनाचा २ न ढळणारे ३ अचळ ४ ससाराच्या पीडा शमन व्हाव्यात हाणून ५ "तथ आत तो भाताचे नि व्याज । जिज्ञामु तो जाणापयालागी भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धी" ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ७-११.) ६ तिसरा अर्यायी, साम ७ ज्ञान्याचे ८ अत्यत आवहीन १ उत्तम, निमन १० पूजितो ११ खोटी वाणी १२ ज्ञान यासनधी ज्ञानेश्वरी अध्याय १८ ओव्या १-१११ पासून पाहाव्या मी कोण ई जेथे प्रकाशित होते तच भक्तीचे रूप १३ "जें तया ज्ञानानि प्रकाशें । फिट भेदाच कडवमें । मग मीचि जाहला समरस । आणि भकही वीचि ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ७-११२) १४ भैलोक्यात HerH