या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

+ २९६ एकनाथी भागवत. दूर दवडी । कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रये ॥ १८ ॥ अनीहा हिंडतो लोकीं तिहीं । तिळभरी ठावो बसावया नाहीं । ईहा वैरिणी लागली पाही । ठायींच्या ठायी दंडवी ॥ १९ ॥ कोणी येवों नेदी दाराकडे । अतिदीन जाली वापुढे । धाय मोकलोनि रडे । गा-हाणे सतांपुढे देवों आली ॥ ९२० ॥ ते कृपाळू दयामेनें । निजकरे पुसोनि डोळे । प्रतिपाळिली स्वहितकाळे । संतवळे वाढली ॥२१॥ त्यापूर्वील वैर सरोनिया। ईहा वैरिणी साधावया।सतांसी पुसोनि उपाया। तिच्या पाया प्रवर्तली ॥२२॥ ईहेसी नाना चेष्टी चेष्टविता । अहं आणि जाण ममता । कामें अंगी घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥ २३ ॥ ईहा कामफळे वाढली थोर । व्यापूनि राहिली घरोघर । तिसी साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥ २४ ॥ असगशस्त्र मागोनि संतां । ईहेच्या करावया घाता। आधी मारूं धांचे अहंममता । दोघे धाकता निमाली ॥ २५ ॥ अनीहा पाठी लागल्या जाण । अहंममतेसी हातारपण । थरथरा कांपोनि प्राण । घोयेंवीण सांडिला ॥ २६ ॥ अनीहा देखोनि दिठी । काम पळे वारा घाटी। सकल्पाचे शेवटिले गोटी । उठाउठी पाडिला ॥ २७ ॥ कामू पडतां रणांगणीं । क्रोधादि शूर पडिले रणीं । ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधूनी मारिले ॥ २८ ॥ एवं अनीहेसमोर । राही ऐसा नाही वीर । मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाही ॥ २९ ॥ काम निमाल्या सर्वथा । ईहा राडवली वस्तुता । मुख ने दावीच सता । अधोगमनता पळाली ॥९३०॥ यालागी ईहेसवे जो लागला । तो जाणावा अधोगती गेला । अनीहेचा जो अकित झाला । तो आवडला गोविदा ।। ३१॥ ह्मणसी अनीहा ते कोण । काय ते ईहेचे लक्षण । ऐक सागेन सपूर्ण । जेणे वाणे खूण जिव्हारी ॥ ३२ ॥ काम्यकर्मादि कियाजाळ । तेचि ईहा जाणावी अतिचपळ । अतरी जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥ ३३ ॥ अतरी कामाची वार्ता । नुपजे कर्माची कर्मावस्था । अणुभरी न रिघे उद्वेगता। अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥ऐशी अनीहा असे ज्यासी । देवो आज्ञाधारकू त्यापाशीं । ते अनीहा सताची दासी । अहर्निशी जीवेभावे ॥ ३५ ॥ हे अनीहा अतिगौरवे । साधुलक्षण तेरावे । मितभोजन ते चौदावे । लक्षणवैभवें अवधारी ॥ ३६ ॥ नं कोंडे रसनेचिया चौडा । न पडे क्षुधेच्या पागडा । आवडीनावडीच्या पाडा । करूनि निधडा भोजनी ॥ ३७ ॥ प्राणु आकाक्षी अन्नाते । जठराग्नि भक्षी त्यातें । उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवीं ॥ ३८ ॥ जे जे आले भोजनासी । दृष्टीने त्याचे दोप निरसी। अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसी सेवितू ॥ ३९॥ न देखे भोग्य पदार्था । नाठवे भी एक भोक्ता । ग्रासी समरसी अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥ ९४० ॥ अग्नि आधी आपणयाऐसे करी । मग त्या आहाराते अगीकारी । साधु आधी द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥ याचि नाव मितभोजन । साधूचे आहाराचे लक्षण । युकीवीण अल्प भोजन । ते पथ्य जाण रोग्यांचे ॥ ४२ ॥ ग्रासोनासी ब्रह्मार्पण । त्या १दचडवी २ तात्काळे ३ नागार्थ ४ देहातीत स्थितीचे ज्ञान कोणाचाही सग न इच्छिणे, अलिशपण है। शास्त्र. . महार यसत्याशिवाय ६ विधा होऊन कोपऱ्यात पराली ७दासपी. ८ ईहेबरोबरच अधोगतीही पळून गेली पसोड दयून बरारी त रणांत १० जिव्हेच्या आपढीचा दास होत नाही ११क्षाधीनतेला १२ पराभवारा, उच्दारा १३ सते, आवटनावर दाराषिता