या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०८ एकनाथी भागवत. त्या साधूंची पूजा न करिता । जो माझी पूजा करी सर्वथा । तेणे मज हाणितल्या लाता। की तो माझ्या घाता प्रवर्तला ।। ९५ ॥ बाळक एक एकुलता । त्यासी माथां हाणितल्या लाता। मग पाटोळाही नेसवितां । क्षोभली माता समजेना ॥ ९६ ॥ तेवीं अबैंगणुनी माझिया सता । मीचि क्षोमें मज पूजितां । ते सेवा नव्हे सर्वथा । अतिक्षोभकता मज केली ॥९७॥ सत माझे लळेवाड । त्यांची पूजा मज लागे गोड । संतसेवकांचे मी पुरवीं कोड । मेज निचाडा चाड सतांची ।। ९८ ॥ साडूनि माझें पूजाध्यान । जो सतासी घाली लोटांगण । कोटि यज्ञाचे फळ जाण । मदर्पण तेणे केले ॥ ९९ ॥ सकळ तीर्थी तोचि न्हाला । जपतपादिफळे तोचि लाहिला । सर्व पूजांचें सार तो पावला । जेणे साधू चंदिला सन्माने ॥ १२०० ॥ प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । सत सचेतन माझ्या मूर्ती । दृढ भावे केल्या त्यांची भक्ती । ते मज निश्चिती पावली ॥ १॥ केल्या प्रतिमा निजकल्पना उत्तम । सत प्रत्यक्ष पुरुपोत्तम । चालतेंबोलतें परब्रह्म । अतिउत्तम साधुसेवा ।। २ ॥ माझ्या प्रतिमा आणि साधुनर । तेथें या रीती भजती तत्पर । हा तंव सागीतला निर्धार । भजनप्रकार तो ऐक ॥ ३ ॥ प्रतिमा आणि साधु सोज्वळे । आवडी न पाहती ज्याचे डोळे । दृष्टि असोनि ते आंधळे । जाण केवळ मोरपिसे ॥ ४॥ जेवी का प्रिया पुत्र धन । देखोनिया सुखावती नयन । तैसे संतप्रतिमाचे दर्शन । आवडी जाण जो करी ॥ ५ ॥ अतिउल्हासें जे दर्शन । या नांव गा देखणेपण । तेणें सार्थक नयन जाण । दृष्टीचे भजन या रीतीं ॥ ६ ॥ देखोनि सत माझी रूपडी । जो धांवोनिया लवडसवडी । खेव देऊनियां आवडी । मिठी न सोडी विस्मयें ॥७॥ ऐसें सताचें आलिगन । तेणे सर्वांग होय पावन । का मूर्तिस्पर्श जाण । शरीर पावन होतसे ॥८॥तीर्थयाने न चालता । सतांसमीप न वचता। हरिरगी न नाचता । चरण सर्वथा निरर्थक ॥९॥ जो का नाना विपयस्वार्थी। न लाजे नीचापुढे पिलंगता । तो हरिरगणी नाच झपातां । आला सर्वथा उठवण्या ।। १२१०॥ तीर्थयात्रा क्षेत्रगमनता । हरिकीर्तना जागरणा जाता । सतसमागमें चालता । का नृत्य करिता हेरिरगी ॥ ११॥ या नाच गा सार्थक चरण । इतर सचार अधोगमन । चरणाचें पावनपण । या नाव जाण उद्धवा ॥ १२ ॥ सर्वभाव अवंचैन । कवडी धरूनि कोटी धन । जेणे केले मदपेण । माझें अर्चन या नाय ॥ १३ ॥ धनधान्य वंचूंनि गाठीं । माझी पूजा आहाच दृष्टी । ते नव्हे अर्चनहींतवटी । तो जाण कपटी मजसी पै ॥ १४ ॥ लो) खावया आपण । ठेवी प्रतिमेपुढे पक्कान्न । अतीत आलिया न घाली कण । मदर्चन ते नव्हे ॥१५॥ कर पवित्र करिता पूजा । ते आवडती अधोक्षजा । जे न पूजिती गरुडध्वजा । त्या जाण भुजा प्रेताच्या ॥१६॥ न करिता हरिपूजने । न देता सत्पात्री दाने। जडित मुद्रा बाहुभूपणे । तें प्रेतासी लेणे लेवविलें ।। १७ ।। वाचा सार्थक हरिकीर्तने । का अनिवार नामस्मरणे । जयजयकाराचेनि गर्जने । केली त्रिभुवने पावन ॥ १८॥ ? पाटाव वगरे महायरल २ समजत घेत नाही, राग जात नाही. अव्हेरुनी ४ आवडते ५ आत्मतृप्त भशा मला ६ जपतपाची ७ मोराचे पर ८ उत्कंठेनें, सरेन न जातां १० पुढ पुर्व करता, युभ्यासारखे श्रीमताच्या पुष उन्धुडता ११ बल जमा उठवणीला येतो मगजे काठी दोपसले किंवा लाया मारल्या तरी उठत नाही तसा. १२ हरिगणी. ११ न ठकविता १४ असून, ठेवून १५ वरवर. १६ अर्चनाचा प्रकार. १७ मा ।