या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. ३२१ इटापूर्तेन मामेव यो पजेत समाहित । लभते मयि सद्भक्ति मरस्मृति साधुसेवया ॥ १७ ॥ करितां नाना योगयाग । वापी कूप वन तडाग। श्रौतस्मात कम चांग । मदर्पणे साग जिंहीं केली ॥ ५॥ ौत अग्निहोत्र सोमयाग । स्मार्त वापी कूप तडाग । मज नार्पिता दोन्ही व्यंग । सत्कर्म साइ मदर्पणे ॥ ६॥ कर्म करिता मदर्पण । अवचटें फळ वाच्छी मन । इतुकियासाठी भक्कासी विघ्न । सर्वथा मी जाण येवों नेदीं ॥ ७ ॥ सकाम कर्मकोसी । जे प्राप्ति नव्हे अतिप्रयासी । त्या उत्तमलोकगतिभोगांसी । मनकासी मी देता ॥ ८ ॥ पोटांतूनि माझा भक्त । दिव्य भोगासी विरक्तू । ते भोग भोगिता मातें स्मरतु । भोगासक्तू तो नव्हे ॥ ९ ॥ साधू देवालया जातां । पर्जन्य पीडिला धारावर्ता । वेश्यागृहासी नेणता । आला अवचिता वोसरिया ।। १५१० ॥ तो वसोनि वेश्येसी नातळे । तेवीं भक्त दिव्य भोगासी काटाळे । ठकलों हाणे अनुतापवळे । पिटूनि कपाळे हरि स्मरे ॥११॥ ऐशिया अनुतापस्थिती । तत्काळ भोग क्षया जाती । तो जन्म पावे महामती । माझी भक्ति जिये गृहीं ॥ १२॥ त्यासी पूर्वसस्कारस्थिती । सकळ विपयाची विरक्ती । उपजतचि लागे भक्तिपंथी । भक्त आवडती जीवेमाणे ॥ १३ ॥ तो मुक्तीतें हाणोनि लातें । निजसर्वस्वं भजे मातें । यापरी मी निजभक्ताते । नेदी विघ्नातें आतळू ॥ १४ ॥ यापरी ज्यास विषयविरक्की । तेही इष्टापूर्त जै करिती । योग याग त्याग 5 साधिती । माझी भक्ती ते उपजे ॥ १५ ॥ समाहित करोनि मन । श्रौतस्मातकर्मानुष्ठान । योग याग त्याग साधन । निष्ठेने जाण में करिती ॥१६॥ तेणे शोधित होय चित्तवृत्ती। झालिया चित्तशुद्धीची प्राप्ती । ते उपजे माझी सद्भक्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥१७॥ इतुकी न करिता आटाटी । माझे सद्भक्तीची होय भेटी । हे अतिगुह्य आहे माझे पोटीं । ते तुज मी गोठी सागेन ॥ १८ ॥ साडोनि सकळ साधन । जो करी साधुभजन । तेव्हाचि त्याचे शुद्ध मन । सत्य जाण उद्धवा ॥ १९॥ ह्मणसी साधु तो कैसा कोण | मागा सागीतले लक्षण । बहु बोलावया नाही कारण । साधु तो जाण सद्गुरू ॥ १५२० ।। त्या सद्गुरूचें भजन । जो भावार्थे करी आपण । सर्व शुद्धीचे कारण । सद्गुरु जाण सर्वाशी ॥ २१ ॥ ज्याचे मुखींचे वचन । ब्रह्मसाक्षात्कारा पाववी जाण । त्याचे सेविता श्रीचरण । शुद्धि कोणकोणा होईना ।। २२ ॥ गुरुनाम घेता मुखें । कळिकाळ पाहू न शके । त्याची सेवा करिता हरिखें । पाया मोक्षसुखें लागती ॥ २३ ॥ ज्यासी सद्गुरूची आरडी चित्तीं। ज्याची सद्गुरुभजनी अतिप्रीती । त्यासी भाळली माझी सड़की । पाठी लागे निश्चिती वरावया ॥ २४ ॥ जो गुरुभजनी भावार्थी । जगामाजीं तोचि स्वार्थी । त्यापाशी माझी सद्भक्ती । असे तिष्ठती आसिली ॥ २५ ॥ सद्भक्ति चापुडी कायसी । अगें मीही अहर्निशी । तिष्ठतसे स्वानंदेसी । गुरुप्रेमासी भूललों ॥ २६ ॥ मज माझ्या भकाची योडी गोडी । परी गुरुभक्तांची अतिआवडी । सत्सगेंवीण रोकडी । सद्भक्ति बोसडी में पविजे ॥२७॥ १ पर्जन्य पाडिला २ चोहोकहून कोसळणाच्या धारानी ३ पसावया ४ रारा ज्ञानी, युरियत ५ इष्ट पपजे यज्ञयागादि वेदोक कमें, ५ पूत झणजे लोकोपयोगी विहिरी, तलाव, उपवनें इसादिव करणे ६ सावपित्त v श्रुतीने आज्ञापिलेली ८ यातायात ९ गोष्टी १. मोहित झाली, सेमली, शाली चित्स्वरूपाची माती ११ अकित झालेली, दासी, पायातली १२ उपजेना R