या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. संगती। भोगिल्या राती नेणों किती । तरी त्यांसी नव्हे तृप्ती । चढती प्रीती मजलागी ॥६१॥ गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती । रास मागीतला एकाती। माझी सुसमाप्ती पावावया ॥६२॥ त्या जाण वेदगर्भाच्या श्रुती । श्रुतिरूपें नन्हे मत्माप्ती । तै परतल्या ह्मणोनि 'नेति नेति' । माझी सुखसगती न पवेची ॥ ६३ ॥ विषयबुद्धि तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण । असतां वेदोक्त जाणपण । तेणेही सपूर्ण न भेटें मी ॥ ६४ ॥ जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख । श्रुति जाणोनि हे निष्टक । गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या ॥ ६५ ॥ त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपे गोकुळा येती । रासक्रीडामिसे एकांती । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥ हाही असो अभिप्रावो । उद्धवा ज्यासी जैसा भावो । त्यालागी मी तैसा देवो । यदर्थी सदेहो असेना ॥ ६७ ॥ उद्धवा मी भक्तांसी देख । कोणे काळी नव्हें विमुख । जो जैसा भावी भाविक । तैसा मी देस तयासी ॥ ६८ ॥ मी जनासी सदा सन्मुख । जनचि मजसी होती विन्मुख । यासी काही न चले देख । दाटूनि दुःख भोगिती ॥ ६९ ॥ मी सकाम सकामाच्या ठायीं । निष्कामासी निष्काम पाहीं । नास्तिका मी लोकीं तिही । असतूचि नाही नास्तिक्ये ॥ १७० ॥ असो हे किती उपपत्ती । ऐक गोपिकांती माझी प्रीती । माझे सुखसगे भोगिल्या राती । त्या मानिती निमेपधि ॥ ७१ ॥ माझ्या वियोगें त्यांसी राती । ज्या आलिया यथास्थिती । त्या गोपिका कल्पप्राय मानिती । सनिध स्वपैति असतांही ॥ ७२ ॥ त्यांच्या दुःखाची अवस्था । बोले न बोलवे सर्वथा । माझेनि घियोगें मातें स्मरतां । समाधिअवस्था पावल्या ॥ ७३ ॥ ता नाविन्मयनुपङ्गपदाधिय स्वमात्मानमतस्तथेदम् । यथा समाधो मुनयोऽधितोये नय प्रविष्टा इव नामरूपे ॥ १२ ॥ मज गोकुळी असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता । हे अवघी समूळ कथा । तुज म्या तत्त्वता सागीतली ॥७॥ ऐशियांसी म्यां अतिनि चाडतां । कृतनाचे परी सांडूनि जाता। माझ्या वियोगकाळीची व्यथा । पापाण पाहता उतटती ।। ७५ ।। यापरी मजवेगळ्या असता । मागे माझी कथा चौता । सदा माझे स्मरण करितां । मदाकारता पावल्या ॥७६ ।। करितां दळणकांडण । माझे दीर्घ स्वरें गाती गुण । की आदरिल्या दधिमथन । माझे चरित्रगायन त्या करिती ॥ ७७ ॥ करितां सडासमार्जन । गोपिकांसी माझें ध्यान । माझेनि स्मरणे जाण । परिये देणे वालका ॥७८ ॥ गायीचे दोहन करिता । माझे स्मरणी आसक्तता । एवं सर्व कर्मों वर्तता । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥७९॥ करिता गमनागमन । अखंड माझ्या ठायी मन । आसन भोजन प्राशन । करिता मख्यान तयासी ।। १८० ॥ एवं मज गेलियापाठी। ऐशी माझी आवडी मोठी अखंड १आझाला ईश्वर सापडला नाही अमै ह्मणून श्रुति सिन झाल्या . वेदाध्ययनाचे शहाणपण ३ जाणीव व नेणीव झणजे ज्ञान व अज्ञान या दोघाच्या पलीकडे ईश्वराचे शुद्ध खरूप आहे, ह्मणूनच ज्ञानोबारायानी अमृतानुभवात दोधाचही खहण केल आहे 'मी देह आह' ही अन्यथा स्फति व 'मी ब्रह्म आह' ही यथार्थ सर्ति, था दोघींची निवृत्ति सचिदानदरूप जो मी त्या माझ्यात होते ४ निधित ५ सर्व ६ याविषयां जेसजैसा ८ युक्ति ९ नेनपाती मिटतात त्याचा अर्धा येळ १. आपले स्वामी ११ बेपरवाई वागता १२ उलनात १३ माझी धाता १४ मुफकठान १५ करीत असताना. १६ झोके, "हदयाकाशपालसो परिये देशी निजे" ज्ञानेश्वरी अध्याय १२-५