या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४२ एकनाथी भागवत ॥ ८२ ॥ प्रपंच ईश्वरासी अभिन्न । येचि अर्थी श्रीनारायण । उद्धवासी सांगे आपण । अभिन्नपणे जीवशिवां ॥ ८३॥ अय हि जीवस्थिवृदब्जयोनिरन्यक्त एको वयसा स आद्य । विश्लिष्टशक्तिबहुधेव भाति वीजानि योनि प्रतिपद्य यद्वत् ॥ २० ॥ जीवाचा जीवू आपण । यालागी बोलिजे शिवपण । जीवशिवरूप हा भिन्न । जीवत्व जाण या हेतू ॥ ८४ ॥ सागर आपुल्या अगावरी । वर्तुळ आंघर्त करीं धरी । तेवीं लोकपझातें श्रीहरी । करी धरी निजनाभी ।। ८५ ॥ 'निवृदज' हणिजे यापरी । त्या नाभिकमळामाझारी । स्वलीला त्रैलोक्याते धरी । पद्मनाभ श्रीहरी या हेतू ॥८६॥ सुवर्णाच्या सिंहासनी । सुवर्णमूर्ती बसवूनी । पूजिजे सुवर्णसुमीं । एकपणे तीन्ही भासती ।। ८७॥ तेवीं नाभिपी त्रैलोक्य धरिता । तिहींतें भासवी अभिन्नता । यालागी पद्मनाभ तत्त्वतां । आलें वाक्पथा श्रुतीचिया ॥ ८८ ॥ इति मार्दवे पिवळी । एकली भासे चांपेकळी । तेचि विकासे जेवीं नाना दळीं । तेवीं मी वनमाळी लोकत्वे ॥ ८९ ॥ हे नसता कार्यकारण । यापूर्वी मी अव्यक्त जाण । जो मी प्रमाणांचाही प्रमाण।"भेदे जेथ आण वाहिली ॥३९०॥ हेतु मातु दृष्टांत । रिघों न शके ज्या गांवांत । अपार अनादि अनंत । आद्य अव्यक्त मी ऐसा ॥ ९१ ॥ एवं केवळ जे अभेद । तेथें कैचे त्रिविध भेद । जेथ लाजोनि परतले वेद । स्वरूप शुद्ध तें माझें ॥ ९२ ॥ तो न मेळविता साह्यमेळू । स्वलीलाक्षो) क्षोभंक काळू । स्वशक्तीने झालों सवळू । शक्तिबंबाळू चेतविला ॥१३॥ ते निजशक्तीचे विभाग । म्याचि विभागिले चांग । त्या विभागाचे भाग। ऐक साङ्ग सांगेन ॥९४॥ गुणशक्ति देवताशकी। मन शक्ति इंद्रियशक्ती । महाभूताची भूतशक्ती । एथ क्रियाशक्ती मुख्यत्वे ॥१५॥ जीवापासाव अदृष्टंशक्ती । झाली अनिवार त्रिजगीं। हरिहरां नावरे निश्चिती । अदृष्टशक्ती अनिवार ॥९६ ॥ जे अदृष्टशक्तीने जीवातें । वांधोनि केले आपैतें । तिशी आवराक्या माते । सामर्थ्य येथे आथिना ॥ ९७ ॥ जेवीं कां राजाज्ञा जाण । राजा प्रतिपाली आपण । तेवीं अदृष्टशक्तिउल्लंघन । मी सर्वथा जाण करीना ॥ ९८॥ जीभ कापूनि देवासी वाहती । तैसे नासिक न छेदिती । तेवीं छेदी कर्मस्थिती । परी अदृष्टगती छेदींना ॥ ९९ ॥ अथवा विशेसी निश्चिती । मी माया आलिगिली निजशकी। तो मी एकूचि त्रिजगतीं । बहुधाव्यक्ती आभासें ॥ ४०० ॥ माझिया साक्षात्कारा आला । जो जीवन्मुतत्व पावला । तोही अदृष्टं बांधला । वर्ते उगला देहगेहीं ॥१॥ जनकू राजपदी नांदे । शुक नागवा प्रारब्धे । कळी लाविजे नारदें। अदृष्ट छदें विनोदी ॥ २॥ वसिष्ठ पुरोहितत्व करी । भीष्म पहुडे शरपंजरी । याज्ञवल्क्या दोनी नारी । अदृष्टाकरी वर्तत ॥ ३ ॥ यापरी गा अदृष्टशक्ती । अनिवार वाढली त्रिजगतीं । त्या जीव बांधले अदृष्टगती । जेवीं गारोडियाहाती वानर ॥४॥ त्या जीवादृष्टें बहुधा व्यक्ती । मी एक भासे त्रिजगतीं । 'विश्वतश्चक्षु' या श्रुती । वहुधामूर्ती मी एक ॥ ५॥ मृत्तिकेची गोकुळे केली । नाना नामा १ भोवरा २ तीनही गुणास आश्रयभूत असा, किंवा नाथानी झटल्याप्रमाणे तीन लोकाना धारण करणारा असा ३ अन्जयोनि झणणे नाटकमलाचा उत्पादक, किंवा नाभिकमलाच्या ठिकाणी प्रलोक्य धारण करणारा ४ मुनास ५ मददीन ६गा नियात, ज्याच्या गावात प्रेरक शक्तीमा झोत ९ जीवापासून १० तारन्धराका ११ साधीन १२ भसेना, नाही १३ प्रारब्धाच परावर्तन १४ नी एकचन महरूप होऊन १५दैवाने १६ राबद्धा.