या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा. गगन गडगडूनि पडे । 'ते न पाहे आणिकाकडे । नाम पढे गुरूचें ॥ ९५॥ काया वाचा मने प्राणे । जो गुरुवाचोनि आन नेणे । तैसाचि भजे अनन्यपणे । गुरुभक्ति झणणे त्या नाव ॥ ९६ ॥ पक्षिणीची अपक्ष पिले । ती तिसीच स्मरती सर्वकाळें । तेवीं जागृतिस्वप्नसुषुप्तिमेळें । जो गुरुवेगळे स्मरेना ॥ ९७ ॥ मागा सांगीतले भगवद्भजन । आता सागसी गुरुसेवन । नाही एकविध निरूपण । ऐसा विकल्प जाण न धरावा ॥९८॥ सद्गुरू तोचि माझी मूती । निश्चयेंसी जाण निश्चिती । विकल्प न धरावा ये अर्थी । अनन्यभक्ति या नाव ॥ ९९ ॥ एकाग्रता जे गुरुभजन । तेचि माझें परम पूजन । गुरूसी मज वेगळेपण । कल्पांती जाण असेना ।। ५०० ॥ गुरु भगवंत दोन्ही एक । येणे भावे निजनिष्टक । भजे तोचि गुरुसेवक । येरू तो देख अनुमानी ॥ १॥ माझिया ऐक्यता अतिप्रीती । जेणे आदरिली गुरुभक्ती । तोचि धन्य धन्य त्रिजगतः । भजती स्थिति ते ऐक ।। २ ।। करावया गुरुसेवे । मनापुढे देह धावे । एकला करीन सर्व सेवे। येवढे हावे उद्यत ।।३।। सेवेच्या दाटणी जाण । अधिकचि होय ठाणमाण । अग अगऊनि अगवण । सेवेमाजी जाण विसावा त्यासी ॥ ४ ॥ सेवेचिया आवडी । औरायेना अर्ध घडी । आवडीचे चढोचढी । चढती गोडी गुरुभजनीं ॥ ५॥ नित्य करिता गुरुसेवा । प्रेमपडिभरू नीचे नवा । सद्भावाचिया हावा । गुरुचरणी जीवा विकिले ॥ ६ ॥ आळसु येवोंचि विसरला । औराणुकेचा ठावो गेला । गुरुसेवासनमें भुलला । घेवो विसरला विषयाते ॥ ७॥ तहान विसरली जीनन । क्षुधा विसरली मिष्टान्न । करिता गुरुचरणसनाहन । निद्रा जाण विसरला ॥ ८॥ जाभयी यावयापुरती । संवडी उरेना रिती । तेथे निद्रेलागी कती । रहाण्या वस्ती मिळेले ।। ९ ।। मुखीं सद्गुरूचें नाम । हृदयीं सद्गुरूचे प्रेम । देही सद्गुरूचे कर्म । अविश्रम अहर्निशी ।। ५१० ।। गुरुसेवेसी गुंतले मन । विसरला स्त्री पुत्र धन । विसरला मनाची आठवण । मी कोण हे स्फुरेना ॥११॥ नवल भजनाचा उत्सायो । भजता नाटवे निजदेहो । थोर सेवेचा नैवलायो । निजात्मभावो गुरुचरणीं ॥ १२ ॥ ऐसाही प्रारब्धमेळा । अवचटें झालिया वेगळा । न तुटे प्रेमाचा जिव्हाळा । भजनी आगळा सद्भागो ॥ १३ ॥ गुरूचा बसता जो ग्राम । तेथेंचि वसे मनोधर्म । गुरुध्यान ते स्वधर्मकर्म । सेवासनम साडीना ॥ १४ ॥ गुरुमूतींची सेवे त्यासी । ते मूर्ति वैसवी हदयावकाशीं । मग नानाभजनविलासी । आवडी कशी भजनाची ।। १५ । चिन्मान प्रर्णिमा गुरु पूर्णचंद्र। तळी आपण होय आर्त चकोर । मग स्वानंदबोधाचे चट्रैकर । निरतर स्वयें सेवी ॥ १६ ॥ सद्गुरु सूर्य करी चिद्गगनी । आपण होय सूर्यकातमणी । त्याचेनि तेजे प्रज्वळोनी । स्वभावें मायावनी होळी करी ॥ १७ ॥ सद्गुरुकृपामृताच्या डोहीं । स्वयं तरगू होय तये ठायीं। सवाह्य तद्भूपें पाही । भावना हृदयी भावितु ॥ १८ ॥ आपुला निजस्वामी जो सद्गुरू । भावी निर्विकल्प कल्पतरू । त्याचे छाये बैसोनि साचारू । मागे वरू गुरुभकी।॥ १९ ॥ १ तैसें २ घने ३ पस न फुटलेली ४ अनन्यपर्ण ५ पूर्ण निधयानं ६ अनिचित युद्धाचा ७ सायुज्यनेसाठी ८ वहीं जेपही सेवा जास्ती, तेवडा तेवटा याया उत्साह जाता होतो व तो आपले सर्व शरीरमामय गुस्सेदेवा सावित्री विभांति घेत नाही १० चढाओटीन ११ प्रेमाची अधिक्ता १२ निल १३ दिसावीचा १४ गुरमत तरतर यात असलामुळे सनम धांदल, गडपड १५ पाणी १६ गुरुचे पाय रगडा १७ रिमामपण १८ कोठून १५ मिळेना. २. अविनम २१ नवल, मदिमा २२ उपय, सेवा २३ उत्सुक २४ चरिण