या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत न करितां सद्गुरुभजन । नव्हे भववृक्षाचें छेदन । जरी कोटिकोटी साधन । आनेआन केलिया ॥७१॥ भववृक्षातें छेदिती । केवळ जाण गुरुभक्ती । अरिनिर्दळणी निश्चितीं। जेवी निजशक्ति शूराची ॥ ७२ ।। दूरी करावया दुरित । जेवीं गंगाजळ समर्थ । तेवीं भवभया भस्म करित । जाण निश्चित गुरुभक्ति ॥ ७३ ॥ करितां सत्यवतग्रहण | पाप स्वये जाय पळोन । तेवीं करितां गुरुभजन । भवनिर्दळण स्वयें होय ॥ ७४ ॥ हनुमंत देखता दिठी । भूतें पळती वारा वाटीं । तेवीं गुरुभजनपरिपार्टी । पळे उठाउठी भयभय ॥ ७५ ॥ मरतां घडे अमृतपान । तै मरणासचि आले मरण । तेवीं करितां गुरुभजन । जन्ममरण निमाले ॥ ७६ ॥ अती अवचटे हरि ह्मणता । पापरा हाणे यमदूता । तेवीं सद्गुरूतें भजता । हाणे लाता भवभया ॥ ७७ ॥ करावया भवनिर्दळण । मुख्य करावे गुरुभजन । हेंचि श्रेष्ठ गा साधन । सभाग्य जाण गुरुभक्त ॥ ७८ ॥ कोण सद्गुरु कैशी भक्ती । ऐसे कांहीं कल्पिसी चित्ती । तेही मी येथानिगुती । मांगा तुजप्रती सागितली ॥ ७९ ॥ जो शब्दपरनिष्णात । शिष्यप्रबोधनी समर्थ । तोचि सद्गुरु येथ । जाण निश्चित उद्धवा ॥४८०॥ जो स्वरूपी करी समाधान । तोचि सद्गुरु सत्य जाण । त्यावेगळे सद्गुरुपण । होआवया कारण असेना ॥ ८१ ।। त्या सद्गुरुभजनाची परी । तुज मी सांगेन निर्धारी । सर्व कर्मधर्माचियां गिरी । जो कां करी गुरुभजन ॥ ८२ ॥ गुरु ह्मणों पित्यासमान । तंव तो एकजन्मींचा जाण । हा मायवाए सनातन । जनक पूर्ण जगाचा ॥८॥ गुरु मातेसमान पाहों । तंव गर्भजन्में तिचा स्नेहो । गर्भवास निवारी गुरुरायो । अधिक स्नेहो पुत्रापरिस ॥ ८४ ॥ उदराबाहेर पडल्यापाठी । पुत्रस्नेहें माता उठी । ते बाहेरील घालून पोटीं । स्नेहे गोमटी गुरुमाता ॥ ८५ ॥ गुरु मानूं स्वामीसमान । स्वामी निवारू न शके मरण । सद्गुरु चुकवी जन्ममरण । स्वामी सपूर्ण गुरुरावो ॥८६॥ गुरु मानूं कुल. देवता । तव तिसी कुलधर्मी पूज्यता । हा कुलदेवतेची देवता । नित्य पूज्यता निजकर्मी ॥८७॥गुरु मानूं कल्पतरूसमान । तंव कल्पतरु दे कल्पिले दान । सद्गुरु दे निर्विकल्पता पूर्ण । अगाध दान निलोंमें ।। ८८॥ चितामणी दे चिंतिल्या अर्था । सद्गुरु करी चिंतेच्या घाता । चित्ता मारूनि दे चैतन्यता । अक्षयता निर्जेदान ॥ ८९॥ कामधेनूचे दुभते । ते कामनेचपुरतें । सद्गुरु दुभे स्वानंदार्थ । कामनेते निर्दली ॥४९० ॥ गुरुसमान ह्मणों सागरू । तो गंभीर परी सदा क्षारू । हा स्वानंदें नित्य निर्भरू । अतिमधुरू निजबोधे ॥ ९१॥ गुरु पर ब्रह्मसमान । हेही बोलणे किंचित् न्यून । गुरुवाक्य ब्रह्म सप्रमाण । येरवीं ब्रह्मपण शब्दमात्र ॥ ९२ ॥ शव्दी लोपूनि शब्दार्था । गुरु प्रबोधी सविदा । त्याहूनि पूज्य परता । नाही सर्वथा त्रिलोकी ॥ ९३ ॥ गुरु माता गुरु पिता । गुरु स्वामी कुळदेवता । गुरुवाचोनि सर्वथा । आणिक देवता स्मरेना ॥९४॥ थोर मांडलिया साकडे । जे १ छेदणारी • निजभक्तिसुराची ३ गगाजळी सामथ्र्य ४ लाथ ५यथास्थितपणे ६ सागेन तुजप्रति उद्धवा ७ सद्गुरु शब्दब्रह्मनिष्णात असावा व परब्रह्मनिष्णात ह्मणजे खानुभवीही असावा 'शाचद पर च निष्णात ताप सद्गुरु शब्दब्रह्मपर प्रकार, तन्हा ९ सर्व कर्मधर्मात गुरुसेवाच श्रेष्ठ होय १० जर मणावा तर ११ चांगली १२ चित्त नाईसि करन चैतन्य देणाराच याप्रमाणे शाश्वत वस्तूचे दान करणारा तोच सदर होय १३ कामितार्थ मान कामधेनु दत, पण सहरु खानदरम देणारा असल्यामुळे कामनाच नाहींशीकरितो १४ सारट १५ज्ञानरूप वस्तूस १६ पलीकडे, आपका